मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची वेळ मिळेना, अखेर महापालिकेने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह केले खुले

90

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा अनावरण कार्यक्रमाला राशियाला जाणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भायखळा येथील त्यांच्या नावाने उभ्या राहिलेल्या नाट्यगृहाला उदघाटनासाठी वेळ देता आला. मागील अनेक महिन्यांपासून महापालिकेचे संबंधित विभाग मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या तारखा मिळवण्याच्या प्रयत्नात होता. परंतु मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोन्ही मान्यवरांच्या तारखाच उपलब्ध होत नसल्याने अखेर गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या नाट्यगृहाचा पडदा खुला केला. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या हस्ते लोकार्पण न करता हे नाट्यगृह खुले झाल्याने मृत्यू पश्चात्यही अण्णा भाऊ साठे हे उपेक्षित राहिले, असे बोलले जात आहे.

भायखळा पूर्व रेल्वे स्टेशनपासून जवळ असणाऱ्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयाजवळील ई‌.एस. पाटणवाला मार्गावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाची निर्मिती मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. तब्बल ७५० आसनांची व्यवस्था असणाऱ्या या भव्य वास्तूमध्ये ‘चारचौघी’ या मराठी नाटकाचा प्रयोग गुढी पाडव्याच्या दिवशी म्हणजेच २२ मार्च २०२३ रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे)  आश्विनी भिडे या एक रसिक प्रेक्षक म्हणून  उपस्थित होत्या. तर परिमंडळ एकच्या उपायुक्त डॉक्टर श्रीमती संगीता हसनाळे यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षकही या नाट्यप्रयोगाला उपस्थित होते.

(हेही वाचा दोन माओवाद्यांचा खात्मा; प्रत्येकी २५ लाखांचे होते बक्षीस)

अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे रशियाला गेले होते, परंतु रशियात अण्णाभाऊंचा पुतळा उभारण्यात तेथील सरकारने पुढाकार घेतला असला तरी राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकारला आपल्याच देशातील आर्थिक राजधानीत मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील अण्णाभाऊ साठेंच्या नावाने उभ्या राहिलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण करण्यासाठी वेळ दिला जात नाही.  हा एकप्रकारे अण्णाभाऊंच्य अनुयायांचा आणि या वास्तूच्या माध्यमातून मनोरंजनाच्या निर्मितीचे सादरीकरण करणाऱ्या  नाट्य निर्माते आणि नाट्य रसिकांचाही मोठा अपमान असल्याच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.

तब्बल ३८ ते ३९ वर्षांनंतर हे खुले नाट्यगृह आता बंदिस्त स्थितीत ७५० आसन क्षमतेचे दिमाखात उभे आहे. मागील एप्रिल २०२१ महिन्यापासून हे नाट्यगृह लोकार्पणाच्या प्रतीक्षेत उभे आहे.  या नाट्यगृहाचे तातडीने लोकार्पण व्हावे म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही महिन्यांपूर्वी निवेदनही सादर केले. परंतु या निवेदनानंतरही ना फडणवीस आपल्या आमदाराच्या मागणीकडे लक्ष दिले ना महापालिकेच्या विनंतीकडे. त्यामुळे आधीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या नाट्यगृहाच्या लोकार्पणकडे दुर्लक्ष केल्यानंतर नव्या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या नाट्यगृहाच्या लोकार्पण करता साधा वेळ देता आला नाही, परिणामी कुणा मान्यवर व्यक्तीच्या हस्ते लोकार्पण न करता महापालिकेने हे नाट्यगृह नाट्य कलावंत, निर्माते आणि रसिकांना खुले करून दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.