मुंबई महापालिकेने थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी कोरोनाच्या साथीआधी मेस्को एरोस्पेसची दोन हेलिकाॅप्टर जप्त केली होती. मुंबई महापालिकेने थकीत 1.95 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यासाठी कोरोना महामारीपूर्वी जप्त करण्यात आले होते. हे जप्त केलेले हेलिकाॅप्टर हे जुहू हॅंगरवर उभी असलेली दोन हेलिकाॅप्टर जप्त केल्यानंतर पालिकेला मोठी वसुली झाल्यासारखे वाटले, मात्र जप्त केल्यानंतर हेलिकाॅप्टरचे काही महत्त्वाचे भाग गहाळ झाल्याने आता त्या हेलिकाॅप्टरची किंमत फक्त 45 लाख झाली आहे. त्यामुळे या जप्तीनंतर मात्र पालिकेचा हिरमोड झाला आहे.
भारतीय विमानतळ प्राधीकरणाला पत्र लिहिले जाणार
मेस्को एरोस्पेसचा थकीत मालमत्ता कर हा 2.76 कोटीपर्यंत वाढल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. पण आता मात्र हेलिकाॅप्टरचे महत्त्वाचे भाग गहाळ झाल्याने ते केवळ भंगारात विकता येणार आहेत. त्यामुळे आता उर्वरीत थकबाकी वसूल करण्यासाठी पालिका भारतीय विमानतळ प्राधीकरणाला पत्र लिहिणार आहे.
( हेही वाचा: राज्यातील 1200 हून अधिक शाळा बंद, सरकारच्या एकतर्फी निर्णयांचा फटका! )
काय आहे प्रकरण
मेस्को एरोस्पेस कंपनीकडे मार्च 2019 पर्यंत 1 कोटी 65 लाख इतका मालमत्ता कर थकलेला होता. ही थकबाकी वसुलीसाठी कंपनीची जल व वीज जोडणी यापूर्वी खंडित केली होती. त्यानंतरही हा कर भरला नसल्याने थकीत कर भरण्यासाठी सातत्याने कंंपनीकडे पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र सातत्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याने संबंधित कंपनीचे दोन हेलिकॉप्टर जप्त केले होते. तरीही थकीत कर भरण्यास टाळाटाळ केल्याने जप्त केलेल्या हेलिकॉप्टरचा लिलाव करून मालमत्ता कर वसूल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता.
Join Our WhatsApp Community