Shivsena Dasara Rally : शिवाजी पार्कवर अखेर ठाकरेंचीच तोफ धडाडणार

192
Shivsena Dasara Rally : शिवाजी पार्कवर अखेर ठाकरेंचीच तोफ धडाडणार

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर (शिवाजी पार्क) यंदाच्या दसरा मेळावा (Shivsena Dasara Rally) कोणत्या शिवसेनेचा होईल याबाबत तर्क वितर्क लढवले जात असतानाच महापालिकेने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC) जी उत्तर विभागानं ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क कोणाला मिळणार? या प्रश्नाचा निकाला लागला आहे. त्यानुसार आता २४ ॲाक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पक्षाचा दसरा मेळावा अन्य ठिकाणी म्हणजेच क्रॉस मैदान किंवा ओव्हल ग्राउंडवर घेण्याची शक्यता आहे.

‘हिंदुस्थान पोस्ट’ ने काही दिवसांपूर्वी म्हणजेच ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी’ शिवतीर्थावरील (Shivsena Dasara Rally) दसरा मेळाव्या बाबत शिवसेनेत संभ्रामवस्था, म्हणून घेतली जाईल माघार’ अशा आशयाचे वृत्त प्रकाशित करून शिवसेना या शिवतिर्थावरील दसरा मेळावाच्या आयोजनातून माघार घेणार असल्याचे भाकीत केले होते.

(हेही वाचा – Israel Hamas Conflict : दहशतवादाचे केंद्र असलेल्या गाझा पट्टीसाठी इस्लामी देश एकवटले; अरब लीगच्या बैठकीत केल्या ‘या’ मागण्या)

शिवसेनेचा परंपरेनुसार दसरा मेळावा (Shivsena Dasara Rally) शिवतीर्थावर होत असतो. त्यामुळे मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता ठाकरे गटाच्या वतीने तसेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वतीने दोन स्वतंत्र अर्ज महापालिकेच्या विभागाकडे प्राप्त झाले होते. मात्र यापैकी कोणत्या गटाला परवानगी द्यावी हा मोठा तिढा महापालिकेसमोर उभा होता.

शिवसेनेच्या वतीने आमदार सदा सरवणकर यांनी अर्ज केला होता. मात्र नंतर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपण अर्ज मागे घेत असल्याची माहिती दिली. त्यांनी ट्विट मध्ये असे म्हंटले आहे की; यावर्षी देखील शिवसेनेचा (Shivsena Dasara Rally) दसरा मेळावा त्याच उत्साहात व्हावा व हिंदूसणांमध्ये एकमेकांमधील वाद टाळावा म्हणून शिवसेना नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दसरा मेळावा अन्य ठिकाणी होणार असल्याचे जाहीर करून सामंजस्याची भूमिका घेतली. त्याबद्दल त्यांचे शिवसैनिक व हिंदुजनतेच्या वतीने जाहीर आभार! तसेच आपल्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान, दसरा मेळाव्यासाठीचा अर्ज मागे घेत आहोत! शिवसेनेने आपला अर्ज मागे घेतल्यामुळे शिवतीर्थावर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार हे आता नक्की झाले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.