Mumbai North West Lok Sabha Constituency : खासदार वायकरांनी केली पोतनीस यांच्या चौकशीची मागणी

368
Mumbai North West Lok Sabha Constituency : खासदार वायकरांनी केली पोतनीस यांच्या चौकशीची मागणी

उत्तर पश्चिम मतदार संघातील निकालाबाबत शंका उपस्थित केली जात असतानाच आता विजयी उमेदवार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी उबाठा शिवसेनेचे विधान परिषद सदस्य विलास पोतनीस यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच ४ जून, २०२४ रोजी विधान परिषदचे सन्माननीय सदस्य विलास पोतनीस हे शस्त्रधारी पोलीस संरक्षकासह केंद्रात प्रवेश केला होता आणि या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केला आहे. (Mumbai North West Lok Sabha Constituency)

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवलल्या पत्रामध्ये, लोकसभा २०२४ ला सार्वत्रिक निवडणूका नुकत्याच पार पडल्या. या निवडणूकीत २७ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात महायुतीकडून रविंद्र दत्ताराम वायकर यांनी निवडणूक लढवली. ४ जून, २०२४ रोजी नेस्को सेंटर येथे मतमोजणी पार पडली. मतमोजणीच्या दिवशी ज्यांना ज्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत अधिकृत ओळखपत्र देण्यात आली होती, त्यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येत होता. असे असताना ही मतमोजणीची प्रक्रिया सुरु असताना विधानपरिषदचे सदस्य विलास पोतनीस यांनी आपल्या शस्त्रधारी पोलीस वर्दीतील अंगरक्षकासह मतमोजणी केंद्रात सायंकाळी ४.०० ते ८.०० या दरम्यान प्रवेश केला, असे म्हटले आहे. (Mumbai North West Lok Sabha Constituency)

(हेही वाचा – Maharashtra Sadan : नळाला नाही पाणी; केंद्रीय मंत्र्यांच्या अंघोळीसाठी मिनरल वॉटरचा वापर)

या लोकसभा क्षेत्राचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या समवेत विलास पोतनीस (Vilas Potnis) यांनी मतमोजणी केंद्रात प्रेवश केला. ही बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली असून आपण गंभीर दखल घेऊन सदस्य विलास पोतनीस यांना तात्काळ मतमोजणी केंद्रा बाहेर जाण्याचा सुचना दिल्या. तुम्ही आत मध्ये कसे आलात? त्यांना कोणी सोडले? शस्त्रधारी अंगरक्षक (पोलीस) वर्दीमध्ये आत कसे आले? असे प्रश्न वायकर यांनी उपस्थित करत या दोघांना मतमोजणी केंद्रातून बाहेर काढण्याच्या सूचना आपण संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. (Mumbai North West Lok Sabha Constituency)

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ज्या व्यक्तीकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेले प्रवेशाचे ओळखपत्र नसेल त्यांना प्रवेश देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश असतानाही तसेच हा नियम उमेदवार अमोल कीतर्किर यांना माहित असतानाही ते आपल्या समवेत सदस्य विलास पोतनीस यांना आतमध्ये कसे घेऊन आले? एक प्रकारे त्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग केला आहे. ही विलास पोतनीस यांना मतमोजणी केंद्रात प्रवेश कसा व कोणाच्या सांगण्यावरून देण्यात आला? त्यांच्याकडे प्रवेशपत्र होते का? शस्त्रधारी पोलीस बंदीतील त्यांचा अंगरक्षक मतमोजणी केंद्रात कसा आला? वर्दीत असताना ही त्यांना कोणी सोडले? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मतमोजणी केंद्रातील सी.सी.टी.व्ही. ची तपासणी केल्यास या सर्व गोष्टी स्पष्टपणे उघड होतील, असे वायकर यांनी आपल्या पत्रांत म्हटले आहे. ही सर्व बाब अतिशय गंभीर असून निवडणूक आयोगाच्या नियमावलीचा भंग करणारी आहे. तरी या सर्व प्रकरणाची आपण सखोल चौकशी करावी अशी विनंती वायकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. (Mumbai North West Lok Sabha Constituency)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.