गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अद्याप दिलासा मिळाला नसल्याचे समोर आले आहे. आज, बुधवारी त्यांच्या जामीन आर्जावर पुन्हा एकदा सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे.
(हेही वाचा – MSRTC: नाशिक-पुणे महामार्गावर बर्निंग ‘शिवशाही’चा थरार! बघा व्हिडिओ)
ईडीने जूनमध्ये पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांना अटक केली होती. राऊत यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात हलवण्यात आला. दरम्यान, आज बुधवारी राऊतांना पुन्हा पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावर ईडीने लेखी स्वरूपात उत्तर दिले. झालेल्या सुनावणीदरम्यान, राऊतांच्या जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 नोव्हेंबर रोजी होणार असून राऊतांना जेल की बेल याचा फैसला 9 नोव्हेंबरला होणार आहे.
Money laundering case | Mumbai PMLA Court extends the judicial custody of Shiv Sena (Uddhav Thackeray) leader & MP, Sanjay Raut by 14 more days. pic.twitter.com/xvggQrhBz1
— ANI (@ANI) November 2, 2022
काय आहे प्रकरण
मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्या पत्नीची देखील चौकशी सुरू केली होती. तसेच राऊत यांचा निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना देखील अटक करण्यात आली होती. प्रवीण यांच्या मदतीने राऊत यांनी हा गैरव्यवहार केला. यानंतर मनी लॉंड्रिंगची रक्कम तपासण्याचे काम सुरू असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे. या व्यवहारात प्रवीण राऊत यांनी मिळालेली रक्कम संजय राऊत यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यात वर्ग केली आहे. तसेच त्यातून राऊत यांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा आरोप देखील ईडीने केला आहे. तर ईडीने 31 जुलै रोजी संजय राऊत यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगत त्याचे खंडन केले असून राजकीय आकसाने आपल्याविरोधात खोटे आरोप केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. पत्राचाळ परिसरातील 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशिष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकण्यात आला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोपही आहे.