ठाकरे गटाच्या बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरणी मुंबई पोलीस गुन्हे शाखेकडून ‘या’ जिल्ह्यात तपास सुरू

131

निवडणूक आयोगाला ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेली हजारो शपथपत्र बोगस असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला होता. याआरोपानंतर या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने तपास सुरू केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची चार पथके कोल्हापूर पालघर, अहमदनगर आणि नाशिक या चार जिल्ह्यात दाखल झाली आहेत. दरम्यान, मुंबईत या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

(हेही वाचा – इंधनाच्या कमतरतेमुळे एसटी बसेसचा खोळंबा, प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा प्रवाशांना फटका)

शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. यानंतर शिंदे गटाने शिवसेना पक्षावर दावा केला. शिवसेना पक्ष आपल्याकडे रहावा, यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू आहे. निवडणूक आयोगासमोर असलेल्या संघर्षात दोन्ही गटांकडून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केले जात आहेत.

तर गेल्या काही दिवसांपूर्वी वांद्रे येथे जवळपास ४६०० च्या आसपास बनावट प्रतिज्ञापत्र तयार केले जात असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी मुंबईत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही प्रतिज्ञापत्र ठाकरे गटांसाठी तयार करण्यात येत असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. नोटरी करणारी व्यक्ती प्रतिज्ञापत्र भरून देत असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. दरम्यान, या बनावट प्रतिज्ञापत्राचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेशषण विभागाने सुरू केला आहे. या तपासादरम्यान, मुंबई गुन्हे शाखेची चार पथकं कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक आणि पालघर या ठिकाणी दाखल झाली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.