महाविकास आघाडीतील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि पालकमंत्री अस्लम शेख यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनी जाहीर कार्यक्रमात तलवार नाचवली म्हणून भाजपचे नेते मोहित कंबोज (भारतीय) यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
कंबोज यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला होता
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा निकाल लागल्यावर भाजप कार्यकर्ते जेव्हा मोहित कंबोज यांच्या घरी गेले होते, तेव्हा त्यांनी तलवार नाचवली होती, त्यावेळी त्यांच्यावर आर्म ऍक्टनुसार कारवाई करण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात मंत्री अस्लम शेख आणि मंत्री वर्षा गायकवाड यांनीही तलवार नाचवली होती. त्यामुळे यांच्याविरोधात कंबोज यांनी आक्षेप घेत तक्रार दाखल केली. यासंबंधी त्यांनी ट्विट केले आहे.
FIR Registered By Mumbai Police Against Minister Aslam Sheikh , Minister Varsha Gaikward and Others Congress Leaders On My Complain Yesterday Of Bandra Sword Incident !
Satyameva Jayate !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) March 28, 2022
(हेही वाचा यशवंत जाधवांना संदीप देशपांडेंनी करून दिली महाभारताची आठवण!)
काय म्हणाले मोहित कंबोज?
खरे तर मुंबई पोलिसांनी स्वतःहून मंत्री वर्षा गायकवाड आणि मंत्री अस्लम शेख यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी त्याप्रमाणे तात्काळ कारवाई केली नाही. म्हणून आपण याविरोधात तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. देर आयी दुरुस्त आयी, अशी स्थिती आहे, असे मोहित कंबोज म्हणाले.
Join Our WhatsApp CommunityMumbai Police Have Registered Arms Act Case On Me For Showing Sword !
Now I Want To See Will Police Will Register FIR AGAISNT These 3 Congress Leaders .
I Request Mumbai Police Commissioner Sanjay Panday To Show Unbiased And Fair Action Or U Are Also Just One Of Like Others ! https://t.co/NYnqk9UUd2 pic.twitter.com/r3wBvWBBDk— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) March 27, 2022