खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन नाट्यमयरित्या ताब्यात घेतले. त्यानंतर आता राणा दाम्पत्याला खार पोलिस स्थानकात आणण्यात आले असून त्यांच्यावर कलम 153 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे या कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाणार आणि हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं राणा दाम्पत्याने सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्या या चिथावणीखोर वक्तव्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी राणा दाम्पत्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
(हेही वाचाः राणा दाम्पत्याला पोलिसांनी घेतले ताब्यात, वाचा हाय व्होल्टेज ड्रामा)
काय आहे कलम?
जेव्हा एखादी व्यक्ती दोन समाज किंवा जातींमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य करते तेव्हा त्यांच्याविरोधात 153 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. जेव्हा अशा प्रकारचा गुन्हा दाखल होतो तो अजामीनपात्र असून त्यात अटक होऊ शकते. पण जर खरंच अशाप्रकारचं विधान करण्यात आलं असेल तरंच हा गुन्हा दाखल करण्यात येतो. तसेच
या कलमांतर्गत थेट अटकेची कारवाई करण्यात येऊ नये, असे देखील सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अनेक निकालांमध्ये म्हटलं आहे.
कायद्याला धरुन आहे का?
या प्रकारच्या कलमांमध्ये पोलिसांनी आरोपींना नोटीस बजावणे आवश्यक असते. नोटीस बजावल्यावर त्यांचा जबाब नोंदवणे आणि जर ते तपासात सहकार्य करत नसतील तर अटकेची कारवाई करणे, अशी प्रक्रिया अभिप्रेत असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीविरोधात असा गुन्हा दाखल झाल्यावर थेट अटकेची कारवाई धरणं हे कायद्याला धरुन नसल्याचं वकील अनिकेत निकम यांनी वृत्तवाहिनीला माहिती देताना म्हटलं आहे.
(हेही वाचाः जर अजित पवार मुख्यमंत्री असते तर… काय म्हणाल्या नवनीत राणा?)
Join Our WhatsApp Community