Mumbai Police : राज्यात मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगारीचे (Cyber crime) प्रमाण वाढत आहे. अशातच या गुन्हेगारीमुळे मोठ्या प्रमाणात जनतेची फसवणूक (Fraud) करून आर्थिक हानी होत असते. अशातच सायबर गुन्हेगारी हे भविष्यातील आव्हान आहे. ही गुन्हेगारी रोखण्यासाठी मुंबईचे पोलीस दल सक्षम आहे. सर्व पोलीस ठाण्यात महिला तसेच नागरिककेंद्री सोयीसुविधा उभारण्यात आल्या आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी येथे केले. (Mumbai Police)
(हेही वाचा – पणदेरी धरणासाठी ६१ कोटींचा निधी मंजूर; राज्यमंत्री Yogesh Kadam यांच्या पाठपुराव्याला यश)
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या विविध उपक्रमांचे लोकार्पण आझाद मैदान पोलीस ठाण्यातील उत्कर्ष सभागृहात सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री योगेश कदम, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पोलिसांच्या नवीन मोटर सायकल, इंटरसेप्टर व्हेइकल्स, फॉरेन्सिक लॅब व्हॅन, निर्भया पथकाच्या व्हॅन यांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला.
मिशन कर्मयोगी
उत्कर्ष सभागृह, पार्क साइट पोलिस स्टेशनची (Parksite Police Station) नूतन इमारत यांचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले. तसेच मुंबईतील ८७ पोलिस ठाण्यांतील महिला व बाल सहाय्यता कक्ष, २१६ पोलीस ठाणे व उपायुक्त कार्यालयांमध्ये उभारण्यात आलेली दूरदृश्य प्रणाली यंत्रणा, पोलीस विभागाचे एक्स हॅन्डल यांचे लोकार्पण, मिशन कर्मयोगी माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. पोलीस प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळाही यावेळी झाला.
(हेही वाचा – BMC : पूर्व मुक्त मार्गावरून थेट ग्रँटरोडला पोहोचणाऱ्या पुलाच्या बांधकामाला ब्रेक?)
सायबर गुन्हे रोखण्यासाठी अत्याधुनिक तीन सायबर लॅब (Mumbai Police Cyber Lab) उभारण्यात आले आहेत. डिजिटल अरेस्टसारख्या प्रकरणांमध्ये सुशिक्षीत लोकही पैसे गमावत आहेत. त्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. त्यासाठीही मुंबई पोलीस विविध उपक्रम राबवत आहेत. महिलांविषयीचे गुन्हे रोखण्यासाठी आणि महिलांना पोलिसांविषयी विश्वास वाटावा, यासाठी पोलीस ठाण्यात महिला व बाल सहाय्यता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community