होळी, गुढीपाडव्यावर जमावबंदीचे संकट!

142

मुंबई पोलिसांनी काढलेल्या जमावबंदीच्या आदेशामुळे आता धुळवड आणि 2 एप्रिल रोजी होणा-या गुढी पाडव्यावर संकट आले आहे. कारण हा जमावबंदीचा आदेश 8 एप्रिलपर्यंत लागू करण्यात आला आहे. तसे मुंबई पोलिसांनी ट्वीट केले आहे. मुंबई शहरात सध्या राजकीय पातळीवर तणावाचे वातावरण आहे, तसेच हे शहर कायम संवेदनशील असते, त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने हे शहर कायम चर्चेत असते. त्यामुळे याविषयी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी हा आदेश काढला आहे.

८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी

या शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. त्यासाठी अनेकदा महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. आता मुंबई पोलिसांनी शहरात जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. त्यानुसार ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, मोर्चा काढणे, जमाव करुन ध्वनीवर्धकाचा, संगीतीय बँड, फटाके फोडण्यास प्रतिबंध केल्याचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले आहे. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ८ एप्रिलपर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी घालण्यात आल्याचे आदेश पोलीस उपआयुक्तांनी जारी केले आहेत. दरम्यान,सध्या होळी, धुलीवंदन आणि नंतर रंगपंचमीचा सण साजरा होत आहे. त्यानंतर गुढी पाडव्याचाही सण येत आहे. त्याचा या सणांच्या साजरीकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा अनिल परबांच्या भोवती आवळला आयकर विभागाचा फास! कुठली आणि किती मालमता लागली हाताला?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.