मुंबईत राणा दाम्पत्याचं ‘असं’ झालं स्वागत

84

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी शुक्रवारी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मातोश्रीबाहेर तसेच राणा दाम्पत्यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांकडून जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांकडून राणा दाम्पत्याला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच राज्यात कायदा-सुव्यवस्ठा ठेवण्याचं आवाहनही त्यांना करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मुंबईत राणा दाम्पत्याचं नोटीस देऊन स्वागत केल्याचं बोललं जात आहे.

(हेही वाचाः लोड शेडिंगवर तोडगा काढणार, ‘या’ राज्यातली खाणच घेणार! उपमुख्यमंत्र्यांची घोषणा)

मुंबई पोलिसांची नोटीस

राणा दाम्पत्यांनी कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल, असं कुठलंही कार्य करू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून त्यांना 149ची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच मुंबईत शांतता राखण्यासाठी त्यांना आवाहन देखील करण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी मंजुनाथ शिंदे यांनी दिली आहे. राणा दाम्पत्य शुक्रवारी सकाळी मुंबईतील आपल्या खार येथील निवासस्थानी आल्याची माहिती मिळत आहे.

शिवसैनिक आक्रमक

राणा दाम्पत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मातोश्रीबाहेर तसेच नवनीत राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी निदर्शने करायला सुरुवात केली आहे. राणा यांच्या पक्षाचे कार्यकर्ते देखील अमरावतीहून मुंबईत येण्यासाठी रवाना झाले आहेत. लवकरच याबाबत राणा दाम्पत्य पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

(हेही वाचाः …तर फडणवीस आज मुख्यमंत्री असते, संजय राऊतांचा गौप्यस्फोट)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.