‘या’ प्रकरणी प्रविण दरेकर यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस

98

मुंबै बँक मजूर प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली असून, या प्रकरणात चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश या नोटशीद्वारे देण्यात आले आहे. ही नोटीसही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. येत्या सोमवारी म्हणजे ४ एप्रिल रोजी प्रविण दरेकर यांना ११ वाजता मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश या नोटीसमध्ये आहेत.

काय आहे प्रकरण?

प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले. आम आदमी पार्टीच्या वतीने धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे २० वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे. या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली आहे.

(हेही वाचा – पवारांनी भूमिका केली स्पष्ट; आता राऊत पडले एकटे?)

मुंबै बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा आरोप

प्रवीण दरेकर १९९७ पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. पण मजूर नसतानाही निवडणूक लढवून प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. मुंबै बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाला असून सहकार कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.