परमबीर सिंहांची साडे सहा तास चौकशी, सर्व आरोप फेटाळले!

न्यायालयाने फरार घोषित केल्यानंतर मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह गुरुवारी सकाळी कांदिवलीच्या गुन्हे शाखेच्या युनिटमध्ये हजर झाले. त्यांची जवळजवळ साडेसहा तास चौकशी करण्यात आली. गुन्हे शाखेची चौकशी पूर्ण झाली आहे आणि परमबीर सिंहांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

अटकेपासून दिले होते संरक्षण

परमबीर सिंह यांच्यावर मुंबई आणि ठाण्यात खंडणी आणि जातीवाचक शिवीगाळ तसेच इतर अनेक आरोपांखाली गुन्हे दाखल आहेत. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना खंडणी आरोप प्रकरणात अटकेपासून संरक्षण दिले. त्याचवेळी न्यायलयाने त्यांना तपासात सहभागी होण्याचेही आदेश दिले.

न्यायालयाने केले होते फरार घोषित 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना न्यायालयाने फरार घोषित केलं होतं. पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला होता. त्यावर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना फरार घोषित केलं होतं. परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर आता त्यांना 30 दिवसांची मुदत दिली गेली होती. या 30 दिवसांत परमबीर सिंह जर न्यायालयासमोर हजर झाले नाहीत, तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार होता. पण आता परमबीर सिंह परतल्यामुळं या प्रकरणाला वेगळं वळण आलं आहे.

  (हेही वाचा : ठरलं! विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here