न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंह अखेर पोलिसांसमोर हजर

193

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याचे न्यूड फोटोशूट प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. ‘पेपर’ या मॅगझिनसाठी रणवीरने न्यूड फोटोशूट केले होते. या बोल्ड फोटोशूटवरून सोशल मीडियावर मोठा वाद देखील झाला होता. याप्रकरणी रणवीरला समन्स बजावण्यासाठी मुंबई पोलीस त्यांच्या घरी पोहोचले होते, मात्र त्यावेळी तो घरी उपस्थित नव्हता. अभिनेत्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती.

(हेही वाचा – ‘सागर’ बंगल्यावर राज ठाकरे-फडणवीसांची खलबतं, तासभरची चर्चा गुलदस्त्यात)

दरम्यान, पोलिसांनी रणवीरला २२ ऑगस्टपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. हे आदेश दिल्यानंतर रणवीरने मुंबई पोलिसांकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला होता. अखेर सोमवारी तो चेंबूर पोलिसांसमोर हजर झाला. रणवीरने चेंबूर पोलीस ठाण्यात न्यूड फोटोशूट प्रकरणी आपला जबाब नोंदविला. यावेळी त्याने पुन्हा चौकशीसाठी बोलावलं तर सहकार्य करेल, असे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये सकाळी ७ वाजता हजर झाला होता. साधारण दोन तास त्याची चौकशी पोलिसांकडून सुरू होती तेव्हाच त्याचा जबाब नोंदवण्याची प्रक्रियाही करण्यात आली. यावेळी त्याची लीगल टीम देखील त्याच्या सोबत पोलीस स्टेशनला हजर होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.