राज्यात सत्तांतर झाल्यावर राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर बदल होऊ लागला आहे. त्यानुसार पोलीस प्रशासनाचीही प्रतिक्रिया बदलू लागली आहे. तत्कालीन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर काढण्यासाठी सोमेय्या कोल्हापूर येथे जाणार होते, त्यावेळी त्यांना मुंबईतच पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्यांना महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला होता. मात्र आता सत्ता बदलल्यावर हेच पोलीस आता आम्हाला याचा पश्चात्ताप होत आहे, अशी प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.
जेव्हा किरीट सोमय्या यांना सीएसएमटी स्थानकावर रोखण्यात आले होते. या सगळ्यामुळे तेव्हा बराच गदारोळ झाला होता. मात्र आता राज्यात नवे सरकार येताच पोलिसांच्या भूमिकेत बदल झालेला दिसत आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत भाष्य केले आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात किरीट सोमय्या यांना ट्रेनमध्ये चढण्यापासून रोखण्यासाठी जी कारवाई करण्यात आली, त्याबद्दल आम्हाला पश्चाताप वाटतो, अशी जाहीर कबुली पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या या बदललेल्या भूमिकेविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
(हेही वाचा देशात दर तासाला होतात तीन बलात्कार, NCRB च्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर)
नेमके काय घडले होते?
गेल्यावर्षी किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यावेळी सोमय्या यांनी कोल्हापूरमध्ये जाऊन हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत किरीट सोमय्या यांना सुरुवातीला त्यांच्या घराबाहेर आणि नंतर सीएसएमटी स्थानकावर रोखून धरले होते. मात्र, तुम्ही मला कोल्हापूरच्या वेशीवर अडवू शकता, इथे मुंबईत नाही, असे म्हणत सोमय्या रेल्वेत बसले व कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले होते.
Join Our WhatsApp Community