“‘त्या’ स्टिंग प्रकणातील माहितीचा स्त्रोत देण्यास मी बंधनकारक नाही”

115

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडल्यानंतर महाविकास आघाडीकडून कोणतंही स्पष्टीकरण अद्याप आलेले नाही. तर भाजप मलिकांच्या राजीनाम्यावर ठाम असताना फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले फडणवीस?

शनिवारी पत्रकार परिषद घेत फडणवीस म्हणाले,  मार्च 2021 रोजी राज्यात झालेल्या बदली घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. राज्यातील अधिकाऱ्यांचा बदली घोटाळा मी उघडकीस आणला होता. दिल्लीत केंद्रीय गृहसचिव यांना मी सगळी माहिती सादर केली. ही माहिती मी बाहेर कुठे बोललो नाही. पण राज्यातील मंत्र्यांनी ही माहिती बाहेर दिली. माझ्याकडे पुरावे आहेत. माझ्या माहितीचा स्त्रोत सांगणं मला बंधनकारक नाहीये. पोलिसांनी चुकीची केस केली असली तरी मी जाणार, पोलिसांना सहकार्य करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा – फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब! स्टिंग ऑपरेशन कोणी केलं? आरोपांवर प्रवीण चव्हाण काय म्हणाले?)

यासंदर्भातील अहवाल सहा महिने सरकारकडे पडला होता मात्र त्यावर कुठलीही कारवाई राज्य सरकारने केली नाही. मग सरकारवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांच्यावर? हा माझा सवाल आहे. राज्य सरकारने केलेल्या षड्यंत्रचा भांडाफोड मी परवा केला म्हणून काही सुचत नसल्याने त्यांनी मला ही नोटीस दिली आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अशी आहे नोटीस…

दिल्लीत केंद्रीय  गृहसचिव यांना मी सगळी माहिती सादर केल्याने न्यायालयाने त्याचं गांभीर्य ओळखून सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश दिले. ऑफिशियल सिक्रेट माहिती लीक कशी झाली याचा FIR महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केला. मला पोलिसांनी नोटीस पाठवून प्रश्न विचारले. विरोधी पक्षनेते म्हणून मला माहितीचा स्त्रोत विचारला जाऊ शकत नाही. मला काल सीआरपीएफ नोटीस मुंबई पोलिसांनी पाठवली. उद्या 11 वाजता बीकेसी सायबर ठाण्यात बोलावले आहे.

सीआरपीएफ 160 ची नोटीस आहे. बदली घोटाळा मी उघडकीस आणला, त्यासंदर्भात नोटीस आहे. मी गृहमंत्री होतो, पण मी पोलिसांना तपासात सहकार्य करणार, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणार. या संदर्भात सीबीआय चौकशी सुरू असून तपासात सत्य समोर येणार असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.