शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना गोळीबार प्रकरणात पोलिसांनी क्लिन चीट दिली आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईतल्या प्रभादेवी इथे शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आले होते. यावळी स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी गोळी चालवल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. पण पोलिसांच्या तपासात सरवणकर यांनी गोळीबार केला नसल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणात पोलिसांनी दिलेला अहवाल विधानपरिषेदत सादर करण्यात आला. यात आमदार सरवणकर यांच्या बंदुकीत गोळी सुटल्याचे नमूद करण्यात आले आहे. पण गोळी सरवणकरांनी झाडली नाही. तर सरवणकरांच्या बंदुकीतून अज्ञात व्यक्तीने गोळी झाडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
यात आमदार सरवणकर यांच्या बंदुकीत गोळी सुटल्याचे नमूद करण्यात आले आहे. पण गोळी सरवणकरांनी झाडली नाही. तर सरवणकरांच्या बंदुकीतून अज्ञात व्यक्तीने गोळी झाडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. यात पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासण्यात आले, तसेच 14 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या अहवालात देण्यात आली आहे. याप्रकरणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला सरकारने परिषेदत लेखी उत्तर दिले. पोलिसांनी दिलेल्या अहवालावर ठाकर गटाचे नेते सचिन अहिर यांनी टीका केली आहे. हा सत्तेचा दुरुपयोग असून मुंबईतील कायदा-सुव्यवस्था ढासळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोणत्याही प्रकारची चौकशी न करता पोलिसांनी अहवाल दिल्याचा आरोपही सचिन अहिर यांनी केला आहे.
(हेही वाचा बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा; ‘मविआ’चे आमदार भोपळा घेऊन उतरले पायर्यांवर)
Join Our WhatsApp Community