मुंबईतील घरगुती आणि सार्वजनिक गणपती बाप्पांना आज निरोप दिला जात आहे. त्यामुळे मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर कचरा, निर्माल्य पसरल्याचे दिसते. हे पाहता महाराष्ट्राचे क्रीडा व युवा मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गिरगाव चौपाटीच्या स्वच्छतेची जबाबदारी एनसीसी संचालनालयाने घेतली आहे.
(हेही वाचा – नाशिकमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत गिरीश महाजनांनी केलं ढोलवादन)
क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली NCC संचालनालय महाराष्ट्राने गिरगाव चौपाटी स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यावेळी सकाळी 9 वाजता मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत.
मुंबईतील गिरगाव, जुहू, वर्सोवा आणि गोराई बीच हे प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. गणेशोत्सवादरम्यान या किनाऱ्यांवर समुद्रात बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे विसर्जनासह दुसऱ्या दिवशीही येथे मोठ्या प्रमाणात कचरा दिसून येतो. हे पाहता येथील महापालिका त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेते. यासोबतच स्वयंसेवी संस्थाही बीएमसीला साफसफाईसाठी मदत करताना दिसतात.
Join Our WhatsApp Community