मुंबई विद्यापीठाचा अल्टिमेटम आणि विद्यापीठाच्या त्रिसदस्यीय समितीचा मतदार यादी छाननीचा अहवाल यामुळे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम अखेर मार्गी लागला आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांच्या आक्षेपानंतर मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. तसेच चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. यासंदर्भात समिती नेमण्यात आली होती. मात्र आमदार आशिष शेलार यांनी केलेले आरोप समितीने खोडून काढल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे (Mumbai University Senate Election)
सगळ्यांच लक्ष लागून राहिलेली मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक आधीच जाहीर झाली होती. मात्र मतदार यादीत एकाच उमेदवाराचे नाव दोनदा नोंदवल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला होता. तस पत्र विद्यापीठाला देण्यात आले होते. त्यानुसार सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. मुंबई विद्यापीठाच्या या स्थगितीच्या निर्णयावर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात समिती नेमण्यात आली होती. मात्र आमदार आशिष शेलार यांनी केलेले आरोप समितीने फेटाळून लावले आहेत.
(हेही वाचा :Election Candidate : तिकिटासाठी नेत्यांची पळापळ; पक्षाने तिकीट दिले नाही तर लगेच दुसऱ्या पक्षात प्रवेश)
मुंबई विद्यापीठ निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले असताना अचानक याला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या निर्देशानंतर मुंबई विद्यापीठाकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यानंतर ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी, छात्र भारती अशा सर्व विद्यार्थी संघटनांनी या निर्णयावर टिका केली होती. मात्र आता सिनेट निवडणुकीचा मार्ग लवकरच मोकळा होईल असेही बोलले जात आहे.
हेही पहा –