मुंबईत शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागा असे आदेशही दिले. यासह ते असेही म्हणाले की, ही महापालिका निवडणूक तुमच्या जीवावर जिंकणार आहे. लोकांसोबत काम करणे हा शिवसैनिकांचा गुणधर्म आहे, ही कामं करत रहा, वॉर्डमध्ये फिरा असा कानमंत्र देखील त्यांनी माजी नगरसेवकांना दिला. जे कोणी गेले त्यांची आपल्याला पर्वा नाही, शिवसैनिक आपल्याला पर्वा नाही. सातत्याने जनतेची कामं करा, सामाजिक बांधिलकी सोडू नका, असा सल्ला देखील उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
(हेही वाचा – आता विमानात दिसणार ‘तृतीयपंथी’ वैमानिक! DGCA ने जारी केली नवी गाईडलाईन, ‘या’ आहेत अटी)
या बैठकीत उद्धव ठाकरेंनी कोणाच्या अमिषाला बळी पडू नका, असा सल्ला देखील माजी नगरसेवकांना दिला आहे. गुरूवारी दुपारनंतर या बैठकीचे निरोप देण्यात आले होते. यावेळी १३ माजी नगरसेवक अनुस्पस्थित होते. जे आज अनुपस्थित होते, त्या सगळ्यांनी त्यांची कारणे पक्षाला कळवली होती, अशी माहिती किशोरी पेडणेकरांनी दिली आहे. या बैठकीला सर्व माजी नगरसेवकांना कामाला लागा, असा मंत्रच दिला असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.
दरम्यान, २०१७ ची वॉर्ड रचना ठरण्याचा आदेश आता एकनाथ शिंदे सरकारने दिले आहेत. त्याला विरोध करत शिवसेना न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचे सांगितले जात आहे. नव्या वॉर्ड रचनेत पुन्हा आरक्षणे बदलण्याचीही शक्यता आहे. यामुळे पुन्हा एखदा निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यताही आहे. अशा परिस्थितीत या नव्या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी शिवसेनेकडून सुरू आहे. तर मुंबई महापालिका निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यासाठी अस्तित्वाचा प्रश्न असण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community