मुंबईचा लॉकडाऊन कधी उठणार? काय म्हणाले पालकमंत्री अस्लम शेख? 

सध्याच्या कडक निर्बंधांमधून हॉटेल्स, सलून, इलेक्ट्राॅनिक्स व्यावसायिक यांना दिलासा देण्यासंदर्भात टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे मंत्री अस्लम शेख म्हणाले. 

सध्या मुंबईतील जनतेचे जोवर ५० टक्के लसीकरण होत नाही, तोवर मुंबईतील लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार नाही, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

लॉकडाऊनवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय!

सध्या मुंबईत कोरोनच्या दुसऱ्या लाटेतील दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आधी हा लॉकडाऊन १५ मे पर्यंत होता, तो १ जूनपर्यंत वाढवला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनची मुदत संपायला अवघे ५ दिवस उरले आहेत. अशा वेळी सगळ्यांना लॉकडाऊन शिथिल करणार कि वाढवणार, याबाबत उत्सुकता लागली आहे. त्यादरम्यान मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. लॉकडाऊन शिथीलतेसंदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईल, असे मंत्री शेख म्हणाले.

(हेही वाचा : कोरोनाकाळात बुद्धांची शिकवण दीपस्तंभासारखी! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिवादन)

हॉटेल्स, सलून, इलेक्ट्राॅनिक्स व्यावसायिक यांना दिलासा मिळेल?

मुंबईत किमान ५० टक्के जनतेचे लसीकरण पूर्ण झाले, तरच लॉकडाऊन उठवता येऊ शकतो, असे सांगत राज्य सरकारने लॉकडाऊनसाठी जे काही मार्गदर्शकतत्वे ठरवून दिली आहेत. त्यामधून हॉटेल्स, सलून, इलेक्ट्राॅनिक्स व्यावसायिक यांना दिलासा देण्यासंदर्भात टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही मंत्री अस्लम शेख म्हणाले. तिसरी लाट येणारच आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून बालचिकित्सा गृह प्रत्येक कोविड सेंटरमध्ये आरक्षित करीत आहोत. ब्लॅक फंगस, येलो फंगस यासंदर्भात आम्ही दक्षता घेऊन उपचार सुरु केलेले आहेत, असेही ते म्हणाले. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत नुकसानभरपाई देण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत होईल. लॉकडाऊन एकदम उघडला जाणार नाही, परंतू सर्वसामान्यांना दिलासा देणाचा विचार सरकारचा आहे. याबाबतची नियमावली कॅबिनेटनंतर जाहीर करण्यात येईल, असेही मंत्री अस्लम शेख म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here