प्राथमिक आरोग्य सुविधेच्या बळकटीकरणासाठी महापालिकेचा कृती आराखडा

187

प्राथमिक आरोग्य सेवेचे बळकटीकरण आणि त्यांच्या दर्जांमध्ये वाढ करण्यासाठी धोरणात्मक नियोजन करण्यात येत असल्याने तांत्रिक साह्य घेतले जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या सर्व कायम तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण व कार्यक्षमता वाढवण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. हा आराखडा प्रत्यक्षात अमलात आणत दैनंदिन कामामध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांना सहकार्य केले जाणार असून या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी लॉर्ड एज्युकेशन ऍड हेल्थ सोसायटी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर मासिक सुमारे २१ लाख ६५ हजारांचा रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

( हेही वाचा : नासा स्त्री आणि पुरुषाला एकत्रितपणे मंगळ ग्रहावर पाठवणार नाही; काय आहे कारण? )

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या कान, नाक व घसा तपासणी, त्वचा रोग, बाल रुग्ण, अस्थिरोग तपासणी, दंत तपासणी व फिजिशियन इत्यादी सेवा अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उपलब्ध करून दवाखान्याचे बळकटीकरण करण्यात येत आहेत. यासाठी हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे पॉली क्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर सुरु करण्यात येत आहे.

या दवाखान्याचे कामकाज पेपरलेस होईल. या कामकाजासाठी सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येणार असून सॉफ्टवेअरच्या डॅशबोर्डमुळे प्रत्यक्ष त्या वेळचे पर्यवेक्षण सहज करणे शक्य होणार आहे. पॉलिक्लिनिक तसेच इतर रुग्णालयात पाठवण्यात येणाऱ्या रुग्णाची माहिती कार्यपूर्ती सहज प्राप्त होतील, याकरता सर्व प्रकारच्या अहवालामधून निदर्शनास येणाऱ्या पुरावे आधारे संकल्पनेची अंमलबजावणी, देखरेख आणि मुल्यांकन करणे आवश्यक असल्यास त्याची सुचना करण्याकरता प्रोग्राम मॅनेजमेंटची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.

याअंतर्गत प्राथमिक आरोग्य सेवेचे बळकटीकरण आणि दर्जोन्नती तसेच आरोग्य सेवेचे सार्वत्रिकीकरण या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी धोरणात्मक नियोजन करण्याच्यादृष्टीकोनातून प्रोग्राम मॅनेजमेंट युनिटची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला . या प्रोग्राम मॅनेजमेंट युनिटद्वारे(पीएमयू) कार्यरत महापालिका दवाखाने तसेच आरोग्य केंद्र यांना भेटी देऊन त्या त्या विभागात अजुन काही सुवा सुविधा पुरवणे अपेक्षित आहे का याचा अभ्यास केला जाईल आणि सुधारणा करण्यासाठी सूचना व कृती आराखडा तयार केला जाईल. या पीएमयूमध्ये किमान ९ सदस्य असतील,अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

यासाठी मागवलेल्या निविदेत केवळ दोनच संस्थांनी सहभाग नोंदवला होता. त्यामुळे महापालिकेने निश्चित केलेल्या मासिक सुमारे १८ लाख ८५ हजार रुपयांच्या अंदाजित रकमेच्या तुलनेत पात्र ठरलेल्या लॉर्ड एज्युकेशन ऍड हेल्थ सोसायटी या संस्थेने ७ लाख ४२ हजार ८१३ अधिक म्हणजे ३९.४१ टक्के अर्थात २६ लाख २७ हजार ८१३ रुपयांची बोली लावली होती. परंतु या युनिटमधील टीमच्या मानधन व प्रवासाकरता होणारा खर्च संस्थेमार्फत करण्याची तरतूद केल्याने सुमारे १८ लाख ८५ हजार रुपयांच्या तुलनेत मासिक खर्च २१ लाख ६५ हजार रुपये एवढा सुधारीत करण्यात आला. त्यामुळे मासिक २१ लाख ६५ हजार २८८ रुपयांप्रमाणे पुढील दोन वर्षांसाठी ५ कोटी १९ लाख ६६ हजार ९१२ रुपये या पीएमयूवर खर्च केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.