किरीट सोमय्यांच्या आरोपांमुळे भाजपालाच बसणार फटका?

108

किरीट सोमय्या यांच्या रडारवर सध्या माविआचे नेते आहेत. ते कोणत्या ना कोणत्या नेत्याचे घोटाळे बाहेर काढत ईडीकडे कागदपत्र सोपवून नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावत आहेत. त्यामुळे त्यांच्या या आरोपांमुळे आता मनपा निवडणुकीत भाजपाला फटका बसू शकतो, अशी चर्चा भाजपच्या अंतर्गत गोटात सुरु आहे.

नेत्यांच्या मनात शंका

भ्रष्टाचाराची विविध प्रकरणे बाहेर काढत ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढवणाऱ्या किरीट सोमय्या यांच्यामुळे आता मुंबईतील भाजपच्या मराठी नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीला काही महिने उरलेले असतानाच किरीट सोमय्या ज्या पद्धतीने आरोप करत आहेत, त्याचा उलटा परिणाम होणार असल्याची शंका भाजप नेत्यांच्या मनात आहे.

( हेही वाचा: …अन् मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेनंच घातला बहिष्कार! )

…म्हणून मराठी नेत्यांना भीती

मुंबई भाजपमध्ये आधीपासूनच दोन गट पाहायला मिळत आहेत. मंगल प्रभात लोढा यांच्याकडे मुंबई भाजपचे अध्यक्षपद गेल्यानंतर, भाजपाचे मुंबईतील काही मराठी नेते लांब झाले आहेत. त्यात मागील काही महिन्यात किरीट सोमय्या, मनोज कोटक आणि इतर भाजपमधील गुजराती नेत्यांचे पक्षात वाढलेलं वजन यामुळे मराठी नेते देखील नाराज आहेत. त्यातच किरीट सोमय्या हे सातत्याने शिवसेनेला टार्गेट करत असल्याने मराठी मते, तर आपल्या हातून जाणार नाहीत ना, याची भीती भाजपच्या मुंबईतील मराठी नेत्यांना वाटू लागली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.