Municipal elections : मनपाच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गेल्या दीड वर्षांपासून या निवडणुका (Municipal elections) रखडल्या होत्या. त्यामुळे विरोधी पक्ष विशेषतः ठाकरे गटाकडून शिंदे - फडणवीस सरकारला निवडुणका घेण्याचे आव्हान दिले जात होते.

151
Municipal elections : मनपाच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार १५ मे रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलतांना एक महत्वाचं विधान केलं आहे. त्यानुसार रखडलेल्या महापालिका निवडणुका (Municipal elections) आता येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता फडणवीस यांनी वर्तवली आहे.

(हेही वाचाMobile Phone : फोन हरवला तरी घाबरू नका; ‘या’ सोयीमुळे पटकन फोन परत मिळणार)

गेल्या दीड वर्षांपासून या निवडणुका (Municipal elections) रखडल्या होत्या. त्यामुळे विरोधी पक्ष विशेषतः ठाकरे गटाकडून शिंदे – फडणवीस सरकारला निवडुणका घेण्याचे आव्हान दिले जात होते. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवल्याने चर्चा सुरु झाल्या आहेत.

हेही पहा – 

मे महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Municipal elections) घेण्याची सूचना केली होती. कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घ्या, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. परंतु त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे-फडणवीस सरकारने वॉर्ड रचना पुन्हा नव्याने करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.