महापालिका निवडणूक ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता – फडणवीस

195
महापालिका निवडणूक ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता - फडणवीस

रविवार २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार तसेच त्यांच्या ८ सहकाऱ्यांनी रविवार (२ जून) युती सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आगामी महापालिका निवडणुकीबद्दल एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी “मुंबई महापालिकेच्या निवडणूका आम्ही लांबवल्या नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षानेच अनेक याचिका दाखल केल्यामुळे या निवडणूका लांबल्या आहेत अशी ठाकरे गटवार टीका केली. तसंच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील, असा अंदाज देखील देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवला. एका वृत्तसंस्थेच्या पॉडकास्टमध्ये देवेंद्र फडणवीस बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी २९ जून रोजी ही मुलाखत दिली होती.

(हेही वाचा –  अजित पवारांना समर्थन दिलेल्या आमदारांची यादी विधानभवनात पोहोचलीच नाही?)

‘ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका होतील’

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आम्ही निवडणुका लांबवल्या नाहीत. निवडणुका व्हाव्यात असं आम्हालाही वाटतंय. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने भरपूर याचिका न्यायालयात दाखल केल्या आहेत, आरक्षणाबाबतची एक याचिका सुद्धा आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व याचिका एकत्र केल्या आहेत आणि स्टेस्टस को ला दिल्या आहेत. या स्टेटस कोमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. ज्यावेळी स्टेटस को हटेल आणि निकाल येईल तेव्हा निवडणुका होतील. उद्धवजी बोलतात की तुम्ही निवडणुका का घेत नाही तेव्हा मला आश्चर्य वाटतं. तुम्ही याचिका दाखल केल्या आहेत, तुम्ही त्या मागे घ्या. स्टेटस को हटेल. दोन्ही बाजूंनी का बोलता? हे राज्य सरकारच्या हातात नाही. माझ्या अंदाजाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निकाल येईल आणि निवडणुका पण होतील.”

मनपा निवडणूक शिवसेनेसोबत लढणार

तसेच “महापालिका निवडणुका आम्ही शिवसेनेच्या सोबत लढणार आहोत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी स्ट्रॅटेजिक अलायन्स करेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.