Municipal Elections : शिवसेना उबाठा गटाच्या स्वबळाच्या नाऱ्यावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया

80
Municipal Elections : शिवसेना उबाठा गटाच्या स्वबळाच्या नाऱ्यावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया
Municipal Elections : शिवसेना उबाठा गटाच्या स्वबळाच्या नाऱ्यावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी आगामी महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी या घोषणेबाबत सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Municipal Elections)

(हेही वाचा- स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी BJP सज्ज, ‘महाविजेता’ अभियानास उद्यापासून सुरुवात)

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शिवसेना ठाकरे गटाचा स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला असेल तर आम्ही कोण थांबवणारे ? मात्र, हा निर्णय घेताना चर्चा व्हायला हवी होती. आम्ही सर्वजण महाविकास आघाडीत आहोत आणि अशा महत्त्वाच्या निर्णयांवर एकमेकांशी संवाद साधणे गरजेचे आहे.” (Municipal Elections)

कॉंग्रेसची प्रतिक्रिया

या घोषणेवर कॉंग्रेसकडूनही तीव्र प्रतिक्रिया आली आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, “महाविकास आघाडीने एकत्र राहून भाजपच्या विरोधात लढण्याची भूमिका घेतली आहे. स्वबळाचा नारा देऊन कोणत्याही पक्षाने भाजपच्या हातात आपली ताकद सोपवू नये.” (Municipal Elections)

(हेही वाचा- Ram Mandir Ayodhya: रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची वर्षपूर्ती; असं असेल ‘या’ तीन दिवसीय सोहळ्याचे नियोजन)

भाजपची टीका

दरम्यान, भाजपने ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “महाविकास आघाडी आता विसर्जित होत आहे. उद्धव ठाकरे गटाचा स्वबळाचा निर्णय म्हणजे त्यांच्या असुरक्षिततेचे लक्षण आहे. महाविकास आघाडीतील फूट हेच भाजपच्या प्रभावाचे प्रमाण आहे.” (Municipal Elections)

मनसेची भूमिका

मनसेने या प्रकरणात अप्रत्यक्षपणे ठाकरे गटावर टीका केली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, “स्वबळावर लढण्याचा निर्णय हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे, पण स्वबळाचा नारा दिल्यानंतर कृतीत काहीतरी वेगळे दिसते. लोकांनी अनेक वेळा असलेले दावे फोल ठरवल्याचे पाहिले आहे.” (Municipal Elections)

(हेही वाचा- Dyanradha Multistate Fraud प्रकरणी ED ने सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात)

महाविकास आघाडीत तणाव ?

संजय राऊत यांच्या घोषणेमुळे महाविकास आघाडीत मतभेद उघड झाले आहेत, असे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे. शिवसेना ठाकरे गटाचा स्वबळाचा निर्णय आघाडीतील सहकार्य आणि एकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो, असा आरोप विरोधक करत आहेत. (Municipal Elections)

ठाकरे गटाचा ठाम निर्णय

शिवसेना ठाकरे गटाने मात्र स्वबळाचा नारा कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे. “महानगरपालिका निवडणुका हे स्थानिक पातळीवरील लढाईचे मैदान आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह आणि मतदारांशी जवळीक वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे,” अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. (Municipal Elections)

(हेही वाचा- Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारीत १५०० मिळणार की २१०० ? वाचा सविस्तर …)

राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता

स्वबळाच्या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीची एकजूट टिकेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Municipal Elections)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.