मुंबई महानगर पालिकेच्या अधिकारी यांना मारहाण केल्याप्रकरणी वाकोला पोलिसांनी शिवसेना नेते (ठाकरे गट) अनिल परब सह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे आणि धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या अटक पूर्व जमीन याचिकेवर आज (३० जून) मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होती. मात्र ही सुनावणी आता ४ जुलै पर्यंत तहकुब करण्यात आली आहे. त्यामुळे अनिल परब यांना ४ जुलै पर्यंत दिलासा मिळाला आहे.
(हेही वाचा – ठाकरे गटाला पुन्हा झटका; आदित्य ठाकरेंचे निकटवर्तिय जाणार शिंदे गटात)
नेमका प्रकार काय?
अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (२६ जून) सांताक्रूझ पूर्व येथील महानगर पालिकेच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या दरम्यान अनिल परब, माजी नगरसेवक सदा परब सह पाच जण सहाय्यक मनपा आयुक्त यांच्या कार्यालयात आले व त्यांनी शिवसेना शाखा कोणी तोडली, बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर हातोडा कोणी मारला असा जाब विचारत सहाय्यक अभियंता अजय पाटील यांना मारहाण केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करून अजय पाटील यांना धमकी दिली.
यावरून वाकोला पोलीस स्थानकात अनिल परबसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community