पुण्याला मंत्रिपद मिळालं आहे. मात्र, त्याचा उपयोग पुण्यासाठी झाला पाहिजे, कंत्राटदारांसाठी नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी मोहोळ यांच्यावर केली आहे. (Murlidhar Mohol on Supriya sule)
(हेही वाचा – PM Modi Ministries : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोणत्या खात्यांची जबाबदारी ?)
NDA सरकारमध्ये पुण्याचे भाजप (BJP) खासदार मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे 40 वर्षांनी पुण्याला मंत्रीपद मिळाले आहे. त्यांच्यावर शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी खोचक टीका केली आहे. दरम्यान मोहोळ यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेत मंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली होती.
ठेकेदारांची भाषा ताई बोलत आहेत…
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ठेकेदारांची भाषा ताई बोलायला लागल्याने हसू येत आहे. कोणाच्या प्रॉपर्टी कुठे आहेत, हे जनतेला माहित आहे. पुढील काळामध्ये आम्ही कार्यकर्ते जशास तसे उत्तर देऊ. सुप्रियाताईंनी शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल आभारी आहे. उत्तर मी देण्यापेक्षा पुणेकरांनीच दिले आहे. पुण्याची राजकीय संस्कृती आहे, 40 वर्षांनी पुण्याला मंत्रिपद मिळालं आहे. त्यामुळे ताईंची मळमळ बाहेर आली आहे, आम्ही सोन्याचा चमचा घेऊन आलो नाही. त्यांच स्वप्न पूर्ण झालं नसल्यामुळे त्यांनी मला खास शुभेच्छा दिल्या आहेत, असे मोहोळ यांनी म्हटले आहे. (Murlidhar Mohol on Supriya sule)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community