कर्नाटकात झालेल्या हिजाबच्या वादाला महाराष्ट्रात जातीय वळण लागू नये यासाठी विविध मुस्लिम सांस्कृतिक आणि सामाजिक संघटनांची गुरुवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत या विषयाला मुंबईसह महाराष्ट्रात अधिक महत्व न देण्याचा निर्णय देण्यात आला आहे.
15 फेब्रुवारी रोजी प्रतिकात्मक निषेध
या बैठकीत मुंबई अमन कमिटी, उलेमा कौन्सिल, मूव्हमेंट फॉर ह्युमन वेलफेअर, जमियत-ए-अहले सुन्नत, जमात ए इस्लामी हिंद, ऑल इंडिया खिलाफत हाउस कमिटी, लोकांची शक्ती मुंबई, जमियत अहले हदीस, रझा फाऊंडेशन, जमियत-ए-उलेमा हिंद, स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया, सद्भावना मंच मुंबई, अंजुमन-ए-खादीम-ए-हुसेन ट्रस्ट आदींसह इतर संघटनांनी या बैठकीत सहभाग घेतला. गुरुवारी संध्याकाळी ज्यांच्या कार्यालयात बैठक झाली, त्या मुंबई अमन कमिटीचे अध्यक्ष फरीद शेख यांनी सांगितले की, ‘सामाजिक सौदार्हय राखणे ही भारतीय संस्कृतीची प्रमुख व्याख्या आहे. कथित छळाच्या विरोधात चिंता व्यक्त करण्यासाठी क्रॉफर्ड मार्केटजवळ मंगळवार, 15 फेब्रुवारी रोजी प्रतिकात्मक निषेध करण्यात येणार आहे. यावेळी केवळ मुस्लिम समाजातीलच नाही, तर सर्व समाजातील लोकांचा सहभाग असेल, असे जमात-ए-इस्लामी हिंद मुंबईचे अध्यक्ष हसीब भाटकर यांनी सांगितले.
(हेही वाचा लता ताईंचे स्मारक शिवाजी पार्कमध्ये उभारावे अशी मंगेशकर कुटुंबाची इच्छा नाही!)
Join Our WhatsApp Community