भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना यापुढे दूरध्वनीवर हॅलो न म्हणता वंदे मातरम असे म्हणण्याचा निर्णय घेतला, त्यांनतर दुसऱ्याच दिवसापासून याला विरोध होऊ लागला आहे. रझा अकादमी या मुस्लिम संघटनेने वंदे मातरम म्हणायला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही फक्त अल्लाची पूजा करतो, असे रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी म्हणाले आहेत. त्यामुळे आता हा वाद आणखी पेटणार आहे.
दुसरा पर्यायी शब्द उपलब्ध करून देण्याची मागणी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात यापुढे अधिकारी, कर्मचारी यांनी फोनवर हॅलो बोलण्याऐवजी वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करावी, असा आदेश सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले आहेत. मात्र या आदेशावरून नवा वाद निर्माण झाला आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या या आदेशाला रझा अकादमीने विरोध दर्शवला असून वंदे मातरम् म्हणणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी यांनी विरोध करत आमच्यात फक्त अल्लाची पूजा होते. सरकारने वंदे मातरम् या शब्दाच्या बदल्यात दुसरा पर्याय उपलब्ध करून द्यावा जो सगळ्यांना मान्य असेल. सरकारच्या या आदेशाविरोधात उलेमा आणि इतर संबंधितांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्यासाठी सरकारला पत्र लिहू असे रझा अकादमीने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community