मुसलमान आता शाळा-महाविद्यालयांमध्ये Quranचे महत्व सांगणार; सोलापूरमध्ये इस्लामचा प्रचार करण्याचे षड्यंत्र

'कुराण मानवतेसाठी मार्गदर्शक' या उपक्रमाची माहिती शहरवासीयांना मिळावी यासाठी मानवी साखळीचे गुरुवारी आयोजन करण्यात आले. तसेच समाजातील मान्यवरांना मराठीमध्ये अनुवाद केलेली कुराणची (Quran) प्रत भेट दिली जाणार आहे.

64
पवित्र कुराण काय आहे? कुराणचे (Quran) महत्त्व आणि आज समाजामध्ये शांतता आणि मानवता नंदण्यासाठी त्याचे महत्त्व काय आहे? यासाठी ‘कुराण मानवतेसाठी मार्गदर्शक’ अशी मोहीम स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया संघटनेने हाती घेतली आहे, अशी माहिती या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष एहतेशाम खान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मराठीत अनुवादित कुराणच्या प्रती वाटणार 

२१ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या दरम्यान सोलापूर शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमधून ही मोहीम राबवण्याचा निर्णय स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया संघटनेने घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत शाळा महाविद्यालयांमध्ये व्याख्याने तर होणारच आहेत ज्यामध्ये विविध क्षेत्रातील अधिकारी, पोलीस प्रशासन, पत्रकार, डॉक्टर, वकील विविध संस्थांचे मान्यवर विचारवंत आणि जनतेचा सहभाग असणार आहे. तसेच या उपक्रमाची माहिती शहरवासीयांना मिळावी यासाठी मानवी साखळीचे गुरुवारी आयोजन करण्यात आले. तसेच समाजातील मान्यवरांना मराठीमध्ये अनुवाद केलेली कुराणची (Quran) प्रत भेट दिली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

गैर मुस्लिमांना जबरदस्तीने इस्लाम सांगणार 

इस्लाम, कुराण (Quran) हा मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी हे उपयुक्त आहे, असे  स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया या संघटनेचे अध्यक्ष खान म्हणाले. या पत्रकार परिषदेस मसुद्दीक खान, उजेर अहमद रंगरेज, अशपाक पठाण, अशपाक अहमद, उसेब अहमद आदी उपस्थित होते. अशा प्रकारे स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया ही संघटना शाळा-महाविद्यालयांमध्ये हिंदू धर्म आणि गैर मुस्लिम विद्यार्थ्यांना जबरदस्तीने इस्लाम धर्म, कुराण याविषयी माहिती देवून इस्लामचा प्रचार प्रसार करण्याचे षड्यंत्र योजले असल्याचे दिसत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.