केरळात चर्च संचालित महाविद्यालयात नमाजासाठी स्वतंत्र जागा देण्याची Muslim विद्यार्थ्यांची मागणी

काही विद्यार्थी संघटनाही मुसलमान विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. मुसलमान विद्यार्थिनींनी सांगितले की, हा त्यांच्या धर्माचा भाग आहे आणि त्यांना स्वतंत्र खोलीची आवश्यकता आहे.

124

केरळमधील एर्नाकुलम येथील चर्चकडून संचालित करण्यात येत असलेल्या निर्मला महाविद्यालयात मुसलमान (Muslim) विद्यार्थ्यांनी नमाजपठणासाठी स्वतंत्र खोलीची मागणी केली आहे. यामुळे वाद निर्माण झाला आहे. मुसलमानांच्या या मागणीला महाविद्यालय प्रशासन आणि चर्च यांनी याला विरोध केला आहे. ख्रिस्ती संघटनांनीही मुसलमान विद्यार्थ्यांच्या या मागणीला विरोध केला आहे.

निर्मला महाविद्यालयाच्या प्रतीक्षालयामध्ये काही मुसलमान (Muslim) विद्यार्थिनींनी २६ जुलै या दिवशी नमाजपठण केले. तेथील कर्मचार्‍यांनी ही माहिती महाविद्यालयाच्या प्रशासनाला दिली. यानंतर प्रशासनाने विद्यार्थिनींना महाविद्यालयात नमाजपठण करण्यापासून रोखले. यानंतर मुसलमान (Muslim) विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आंदोलन चालू केले आणिदररोज नमाजपठण करण्यासाठी महाविद्यालयात स्वतंत्र खोलीच द्या, अशी मागणी केली. काही विद्यार्थी संघटनाही मुसलमान विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. मुसलमान विद्यार्थिनींनी सांगितले की, हा त्यांच्या धर्माचा भाग आहे आणि त्यांना स्वतंत्र खोलीची आवश्यकता आहे.

(हेही वाचा लैंगिक अत्याचार पीडितांची वैद्यकीय तपासणी केवळ महिला डॉक्टरांनीच करावी; Karnataka High Court चा निर्णय)

महाविद्यालय म्हणते, नामाजासाठी शुक्रवारी सुटी देऊ 

महाविद्यालयाचे प्राचार्य जस्टिन कन्नन यांनी याला स्पष्ट नकार दिला. महाविद्यालय प्रशासनाने सांगितले की, ही एक धर्मनिरपेक्ष संस्था असून येथे कुणालाही नमाजपठण करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. जर त्यांना नमाजपठण करायचे असेल, तर त्यांना शुक्रवारी सुटी दिली जाईल, त्यांना केवळ लेखी अर्ज द्यावा लागेल.

सायरो मलबार चर्च आणि ‘कॅथॉलिक काँग्रेस’ यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला. सायरो मलबार चर्चच्या सार्वजनिक व्यवहार समितीने म्हटले आहे की, ख्रिस्ती संस्थांमध्ये धार्मिक हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नांना विरोध केला जाईल. चर्चचे प्रमुख बिशप थरायल म्हणाले की, निर्मला महाविद्यालयातील घटनांमुळे येथील वातावरण बिघडले आहे. ही एक स्वायत्त संस्था आहे, जी स्वतःचे शैक्षणिक मानक राखते. केरळमधील २ प्रमुख विद्यार्थी संघटनांनीही मुसलमान (Muslim) विद्यार्थ्यांच्या मागणीचे समर्थन करून महाविद्यालयातील वातावरण बिघडवले आहे. कॅथॉलिक काँग्रेसने म्हटले आहे की, चर्चकडून चालवली जाणारी महाविद्यालये आणि शाळा यांमध्ये नमाजपठण करण्यासाठी कोणतीही खोली किंवा जागा दिली जाणार नाही.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.