‘इस देश मे रहेना होगा, तो भारतमाता की जय कहेना होगा’ अशा शब्दात भाजपचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आज विधानसभा सभागृह दणाणून सोडले. या देशाचे अन्न खायचे, पाणी प्यायचे आणि भारतमाता की जय म्हणायला विरोध करायचा हे या देशात चालणार नाही. भारतमाता की जय घोषणा करणे हा काही गुन्हा नाही, अपशब्द नाही की कुठल्या धर्मावर अतिक्रमण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
औचित्याचा मुद्दा
छत्रपती संभाजी नगर जवळच्या करमाळ गावातील शिक्षकाने विद्यार्थ्यांना ‘भारतमाता की जय’ घोषणा देण्यासाठी बंदी घातली. त्याचे तीव्र पडसाद आज राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत उमटले. बागडे यांनी औचत्याच्या मुद्याद्वारे विषय मांडत या प्रकरणाची चौकशी करावी, अशी जोरदार मागणी केली.
घोषणा बंद
अधिक माहिती देताना बागडे म्हणाले की, संभाजीनगरपासून १०-१२ किमी अंतरावर एका गावातील सय्यद खान नावाच्या शिक्षकाची उर्दू शाळेत (Muslim) बदली झाली. “मराठी आणि उर्दू दोन्ही भाषेच्या शाळा एकाच ठिकाणी (campus) भरत असल्याने सगळे विद्यार्थी एकत्र प्रार्थनेला जमा होत. प्रार्थना झाली की ‘भारतमाता की जय’ अशी घोषणा दिली जात असे. मात्र त्या शिक्षकाने अन्य शिक्षकांना सांगून ही घोषणा बंद करायला लावली.”
पाक पंतप्रधानाचा दिन विशेष..
“त्याने असेच प्रकार आधीच्या शाळेतही केले आहेत. शाळेतील एक दिवस ‘दिन विशेष’ म्हणून साजरा केला जातो. तो दिवस याने पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानाचा वाढदिवस म्हणून त्यांना शुभेच्छा देऊन साजरा केला. यामुळे मराठी विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला आणि विषय वाढला,” असे त्यांनी सांगितले.
चौकशी करावी
“अशा मानसिकतेचा शिक्षक असेल तर तो नको. जो भावना भडकवत आहे. सरकारी शिक्षक असून तो हे असे भावना भडकवण्याचे काम करत असेल तर त्याची चौकशी करावी अशी मागणी करणारे पत्र मी शिक्षक मंत्र्यांना दिले आहे, अशी माहिती बागडे यांनी दिली.
Join Our WhatsApp Community