Kanifnath Yatra मध्ये मुसलमान व्यापाऱ्यांवर बंदी; तक्रारींमुळे ग्रामस्थांनी घेतला निर्णय

सरपंच आणि कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय बाजीराव मरकड म्हणाले की, एक महिन्यावर कानिफनाथांची यात्रा आली आहे. त्यामुळे बऱ्याचशा भाविकांच्या भावना तीव्र आहेत. या यात्रेमध्ये बहुसंख्य व्यापारी हे मुस्लिम असतात आणि ते आमची परंपरा पाळत नाहीत.

83

प्रयागराज येथील कुंभमेळामध्ये मुसलमानांना प्रवेशबंदी घालण्यात आली होती, तसेच आता पाथर्डी तालुक्यातील मढी कानिफनाथ महाराजांच्या यात्रेमध्ये (Kanifnath Yatra) मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांवर बंदी घालण्याचा ठराव करण्यात आला आहे. हा ठराव ग्रामस्थांनी एकत्र येऊन केला.

होळीपासून या यात्रेला (Kanifnath Yatra) सुरुवात होते तर गुडीपाडव्याला सांगता होत असते. या प्रकरणी सरपंच आणि कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय बाजीराव मरकड म्हणाले की, एक महिन्यावर कानिफनाथांची यात्रा आली आहे. त्यामुळे बऱ्याचशा भाविकांच्या भावना तीव्र आहेत. या यात्रेमध्ये बहुसंख्य व्यापारी हे मुस्लिम असतात आणि ते आमची परंपरा पाळत नाहीत. त्यावर चर्चा झाली. या काळात महिनाभर देवाला तेल लावलेले असते. हा दुखवट्याचा कालावधी असल्याने या काळात आम्ही कोणतेही शुभ कार्य करत नाही, शेतीची कामे करत नाही. तेलात तळलेले पदार्थ खात नाही. गादी आणि खॉटही वापरत नाही. पण गावात आलेले मुस्लिम व्यापारी मात्र ही परंपरा पाळत नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांच्या भावनांना ठेच लागते. कुंभमध्ये जसे मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहेत तशाच प्रकारे आम्ही मढी कानिफनाथांच्या यात्रेत (Kanifnath Yatra) मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे असे सरपंच म्हणाले.

(हेही वाचा Mhada Lottery: सर्वसामान्य मुंबईकरांचं स्वप्न पूर्ण होणार; म्हाडाकडून २ हजार घरांसाठी  लॉटरी निघणार)

भाविकांच्या तक्रारीनुसार ठराव मांडला

सरपंच संजय बाजीराव मरकड म्हणाले की, जे लोक स्वतः कुंकू लावत नाहीत ते लोक आम्हाला कुंकू विकतात ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. मुस्लिम व्यापाऱ्यांचे या ठिकाणी दोन नंबरचे धंदे सुरू असतात. त्यांच्याकडून भाविकांची लूट होते. या आधी भाविकांना मारहाणही करण्यात आली होती. अशा भाविकांनी, ग्रामस्थांनी आमच्याकडे पत्रे लिहित मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदी आणावी अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार आता कानिफनाथांच्या यात्रेमध्ये (Kanifnath Yatra) मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.