लोकसभा निवडणुकीच्या मुंबईतील मतदान सोमवारी, २० मे रोजी सुरु आहे, मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला. जोगेश्वरीतील मुस्लिमांच्या (Muslim) समाजसेवी संस्था मशिदीत एकत्र आल्या आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी उबाठा गटाला मतदान न करण्याचे आवाहन मुस्लिमांना केले. हा व्हिडीओ सोशल मीडियात सर्वत्र व्हायरल झाला. आयबीएन 18ने याविषयी वृत्त प्रकाशित केले आहे.
View this post on Instagram
(हेही वाचा Lok Sabha Election Voting : पवई हिरानंदानी येथे 3 तास मतदान खोळंबले; कलाकरांसह नागरिक संतापले)
या व्हिडिओमध्ये मुसलमान (Muslim) संस्थांचे पदाधिकारी उबाठा गटाचा काहीही भरवसा नाही. कट्टर हिंदुत्वाचा विचार मांडणारे उद्धव ठाकरे आता यांच्याकडे मतांसाठी का हात पसरत आहेत, उद्या ते पुन्हा भाजपशी हातमिळवणी करतील, त्यामुळे आम्ही सर्व मुसलमानांना (Muslim) उबाठाला मतदान करू नका, त्याऐवजी नोटाला मतदान करण्याचे आवाहन करत आहोत, त्यासाठी आम्ही दिवस-रात्र एक करणार आहोत, असे हे मुसलमानांचे पदाधिकारी त्या व्हिडिओमध्ये म्हणत होते. या व्हिडीओमुळे उबाठाला नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुसलमानांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या उबाठाला या व्हिडिओमुळे चर्चेला उधाण आले आहे.
Join Our WhatsApp Community