ट्रिपल तलाकनंतर आता मुस्लिम महिलांनी ‘या’ तलाकलाही केला विरोध, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

130

मोदी सरकारने ट्रिपल तलाक ही प्रथा कायद्याने बंद पाडली. त्यानंतर आता मुस्लिम महिलांनी आणखी एका तलाक पद्धतीला विरोध केला आहे. तलाक-ए-हसन या तलाक पद्धतीला स्वतः मुस्लिम महिलांनी विरोध केला आहे. त्यासाठी या महिलांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुस्लिम धर्मातील तलाक-ए-बिद्दत म्हणजे ट्रिपल तलाक बेकायदेशीर ठरवल्यानंतर आता तलाक-ए-हसन बेकायदेशीर ठरवा अशा आशयाची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका दोन मुस्लीम महिलांनी दाखल केली आहे. ही प्रथा मुस्लिम महिलांसाठी अन्यायकारक असून ती रद्द करावी असे या याचिकेत म्हटले आहे. मुस्लिम धर्मातील ट्रिपल तलाक प्रथा बेकायदेशीर ठरवल्यानंतर घटस्फोट घेण्यासाठी आता तलाक-ए-हसन ही प्रथा वापरात येत आहे.  प्रथमदर्शनी पाहता तलाक-ए-हसन हा महिलांवर अन्याय करणारा दिसत नाही असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहे.

(हेही वाचा ‘वंदे मातरम’ची काँग्रेसलाही ऍलर्जी! धर्मांध रझा अकादमीच्या पावलावर पाऊल )

काय आहे तलाक-ए-हसन प्रकार? 

ट्रिपल तलाक मध्ये पती एकाच वेळी तीन वेळा ‘तलाक, तलाक, तलाक’ म्हणतो, तर तलाक-ए-हसन या प्रथेनुसार जर एखाद्या मुस्लिम व्यक्तीला त्याच्या पत्नीला घटस्फोट द्यायचा असेल तर एक-एक महिन्याच्या अंतराने तीन वेळा तलाक हा शब्द उच्चारतो. म्हणजे या पद्धतीने घटस्फोट घेण्यासाठी तीन महिन्यांची प्रक्रिया असते. या दरम्यान, पती आणि पत्नी आपला विचार बदलून पुन्हा एकत्र येऊ शकतात. प्रथम दर्शनी ही प्रथा महिलांच्या विरोधी नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

महिलांनाही घटस्फोट घेण्याचा अधिकार

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मुस्लिम महिलांनाही घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे. जर दोन व्यक्तींना एकत्रित रहायचे नसेल तर त्यांनी घटस्फोट घेणे उत्तम असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. घटस्फोट घेताना फक्त मेहेरच्या रक्कमेचा प्रश्न उपस्थित होतोय. मेहेर म्हणजे घटस्फोट घेताना पतीने त्याच्या पत्नीला द्यायची रक्कम होय.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.