स्वीडनमध्ये कुराण जाळल्याची घटना घडल्यापासून इस्लामिक देशांमध्ये उत्तर युरोपमध्ये असलेल्या या देशाविषयी संताप वाढत आहे. आता इराकची राजधानी बगदादमध्ये हजारो मुस्लिमांनी स्वीडनच्या दूतावासाबाहेर निदर्शने केली. गुरुवारी, 20 जुलै 2023 रोजी तर स्वीडनच्या दूतावासात घुसून जाळपोळ करण्यात आली. यादरम्यान तेथे शिया मुसलमानांनी ध्वज फडकावला. आंदोलक इराकी नेते मुक्तादा अल-सद्र यांचे पोस्टरही फडकवत होते.
या घटनेचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत. गेल्या महिन्यात स्वीडनमध्ये कुराण जाळणारी व्यक्ती प्रत्यक्षात इराकमधील निर्वासित होती. आता त्याने पुन्हा एकदा कुराण जाळण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे हजारो मुस्लिम स्वीडिश दूतावासाच्या प्रवेशद्वारावर चढले आणि गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यासोबतच स्वीडनच्या दूतावासाच्या आवारातही नमाज अदा करण्यात आली. हे आंदोलक पहाटेच तेथे पोहोचले होते. पहाटे, सुरक्षा दल त्यांना हटवण्यासाठी पोहोचले. तेथूनही धूर निघताना दिसत होता. अग्निशमन दलाचे जवानही फायर ट्रकच्या पायऱ्या चढून आग विझवताना दिसले. दूतावासातील कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती स्वीडनने दिली आहे. स्वीडनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही आपल्या कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे.
(हेही वाचा Landslides : बारा वर्षांपासून मुंबईत दरडी कोसळून होणाऱ्या दुर्घटनेवर उपाययोजना नाही)
Join Our WhatsApp Community