PM Narendra Modi यांना हरवण्यासाठी मुस्लिम वाढवत आहेत उबाठा शिवसेनेची ताकद, परिधान केल्या भगव्या टोप्या

462
PM Narendra Modi यांना हरवण्यासाठी मुस्लिम वाढवत आहेत उबाठा शिवसेनेची ताकद, परिधान केल्या भगव्या टोप्या

उबाठा  शिवसेनेने हिंदुत्व सोडले असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांसोबत जात त्यांनी मुस्लिम समाजाला अगदी जवळ केले आहे. त्यामुळे उबाठा शिवसेनेच्या प्रचारात मोठ्याप्रमाणात मुस्लिम समाज सहभागी होत असून दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचार फेरीत शनिवारी डोक्यावर गोल भगव्या टोप्या घातलेले मुस्लिम सहभागी झाले होते. त्यामुळे एरव्ही पांढऱ्या गोल टोप्या घालणारे मुसलमान केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना हरवण्यासाठी भगव्या गोल टोप्या घातल्या. परंतु आज उद्धव ठाकरेंना बळ देण्यासाठी मुस्लिमांनी यासाठी पुढाकार घेतला असला तरी भविष्यात आज घातलेल्या भगव्या गोल टोपी बदलून पुन्हा सफेद टोपीतून हिरवे फुत्कार सोडणार नाही याची गॅरंटी कोण देणार अशी कुजबुज रॅली पाहणाऱ्या लोकांकडून व्यक्त होत होती. (PM Narendra Modi)

New Project 2024 05 18T210137.322

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दक्षिण मध्य मुंबईचे लोकसभा उमेदवार अनिल देसाई यांची प्रचार फेरी वडाळ्यापसून सुरुवात झाली आणि धारावी, माहिम करत दादरमील खांडके इमारतीखाली याचा समारोप झाला. या रॅलीमध्ये भगव्या गोल टोप्या घातलेले मुस्लिम समाज मोठ्या संख्येने झाला होता. या सभेच्या ठिकाणी भगवी गोल टोपी धारक मुस्लिम एकत्र जमा झाले आणि त्यांनी शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. यासर्वांनी मग सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांना पुष्पहार घातला. मुस्लिमांचे हे प्रेम पाहून उद्धव ठाकरेंनी त्यांचा हार स्वीकारत त्यांच्यासोबत फोटोही काढले. यामध्ये दादरमधील मुस्लिम फेरीवाले अधिक असल्याचे बोलले जात आहेत. या मुस्लिमांकडून पांढऱ्या गोल टोप्या परिधान केल्या जाणार होता, परंतु त्यामुळे मुस्लिमांचे अस्तित्व दिसून येत असल्याने भगव्या रंगाच्या टोप्या उबाठा शिवसेनेने विशेष तयार केल्या. त्यामुळे मुस्लिमांसाठी उबाठाला शिवसेनेला भगव्या टोप्या तयार केल्या असल्याचे बोलले जात आहे. या टोप्यांचे खास वाटप मुस्लिमांना करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. (PM Narendra Modi)

New Project 2024 05 18T210223.187

(हेही वाचा – माँसाहेब आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस वंदन करत Rahul Shewale यांनी केली प्रचाराची सांगता)

एका बाजुला या मुस्लिमांनी भगव्या गोल टोप्या परिधान केल्या असल्या तरी यामागे स्वार्थ दडलेला आहे. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोदी (PM Narendra Modi) यांच्याशी लढत ‘अपकी बार ४०० पार’ नाही तर हद्दपार हा नारा खरा ठरवण्यासाठी हे मुस्लिम समाज भगव्या टोप्या घालत असले तरी भविष्यात पुन्हा सफेद टोप्या घालून फुत्कार सोडणार नाही याची हमी उद्धव ठाकरे देतील का असाही प्रश्न रहिवाशांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे दादर येथील सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी माझ्या जमलेल्या तमाम हिंदु बंधू, भगिनी आणि मातांनो असा उल्लेख न करता माझ्या राष्ट्रभक्त बंधू भगिनी आणि मातांनो असा उल्लेख भाषणाच्या प्रारंभी केला. (PM Narendra Modi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.