बसगाडीवरील भगवा झेंडा मुसलमानांनी जबरदस्तीने काढला; Mamata Banerjee यांनी कोलकाताला बनवले ढाका

92

कोलकातामध्ये काही लोकांकडून बसगाडीवर लावलेला भगवा झेंडा जबरदस्तीने काढून टाकल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप करत आहे. कोलकाता हे नवे ढाका बनले आहे का, असा प्रश्न भाजपाने केला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका बस चालकाला मुसलमानांनी घेरले आहे आणि ते त्याला बसगाडीवरील भगवा ध्वज उतरवण्यास भाग पाडत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे ही घटना उत्तर कोलकाता येथील स्वामी विवेकानंद यांचा निवास होता त्या घरासमोर घडली. हा व्हिडिओ शेअर करताना, भाजपा खासदार सुकांता मजुमदार यांनी प्रशासन आणि पोलिसांवर टीका केली. मुसलमानांच्या धर्मांधकडे ममता बॅनर्जी मूकसंमती दर्शवत आहेत, असा आरोप केला, असे मजुमदार यांनी X वर लिहिले.

पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनीही या घटनेचा निषेध केला आणि हा हिंदू श्रद्धेवर थेट हल्ला असल्याचे म्हटले.

flag

(हेही वाचा Jaliyanwala Bagh हत्याकांड; ब्रिटिश साम्राज्याच्या निर्दयी आणि क्रूरतेच्या इतिहासाची १०५ वर्षे पूर्ण)

“स्वामी विवेकानंदांच्या जन्मस्थळी, कोलकाता येथील धक्कादायक दृश्ये! धैर्य, बलिदान आणि शौर्याचे प्रतीक असलेला भगवा ध्वज कट्टरपंथींच्या जमावाने बसवरून जबरदस्तीने काढून टाकला, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या देखरेखीखाली, पोलिस शांतपणे उभे असतात, असेही त्यांनी लिहिले.

भाजपा खासदार खर्गेन मुर्मू यांनी आरोप केला की, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या मुस्लिमांविरुद्ध हिंदूंना भडकावून आणि त्यांना रस्त्यावर आणून पश्चिम बंगालला बांगलादेश बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोलकातामध्ये वक्फ कायद्याच्या अंमलबजावणीवरील निदर्शनांमध्ये भगवे ध्वज फाडण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

भाजपा नेते दिलीप घोष यांनी हिंदूंविरुद्ध भेदभावाचा आरोप केला. “येथे तुम्हाला हमास, पॅलेस्टाईन, सीरिया, पाकिस्तान आणि अगदी आयएसआयचे झेंडे फडकलेले आढळतील पण रामनवमीचे झेंडे गाड्यांवरून काढून टाकले जात आहेत. कोलकाता ढाका, सीरिया की अफगाणिस्तान झाला आहे का?” असा प्रश्न त्यांनी विचारला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.