मुसलमान म्हणतात, काँग्रेस आणि शरद पवारांनी UBT सोबतचे संबंध तोडावेत

253
महाविकास आघाडीत उबाठा (UBT) आता नको, अशी भूमिका मुसलमान घेत आहेत. समाजवादी पक्षानंतर ऑल इंडिया उलेमा बोर्डाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने उद्धव ठाकरे यांच्यासोबतच संबंध तोडावेत, असे आवाहन केले आहे.
ऑल इंडिया उलेमा बोर्डाने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, 6 डिसेंबर रोजी ठाकरे गटाने (UBT) वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन आणि बॅनर लावून बाबरी मशीद पाडल्याबद्दल अभिमान व्यक्त केला होता, तर महाविकास आघाडीची स्थापना याच अटीवर केली गेली होती की, कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने (UBT) जिंकलेल्या बहुतेक जागा मुस्लिम बहुल भागातील आहेत, त्यामुळे मुस्लिम नेतृत्व उदयास येत नाही, असे बोर्डाने पत्रात म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या मनात दोष आहे, त्यांना फक्त मुस्लिमांची मते घ्यायची आहेत. मुस्लिमांना प्रतिनिधित्व द्यायचे आणि त्यांच्या समस्या सोडवणे हे त्यांचे उद्दिष्ट नाही, असेही बोर्डाने त्यांच्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (UBT)  यांच्या हातून आता हिंदुत्वही गेले आणि मुस्लिमांचा पाठिंबाही गेला आहे, असे दिसते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.