महाविकास आघाडीमधील (MVA) तिन्ही पक्षांमध्ये ८५-८५-८५ जागांचा फॉर्म्युला ठरल्याचे सांगतानाच तब्बल २७० जागांवर एकमत झाल्याचे मविआचे नेते संजय राऊत यांनी सांगितले. जर तिन्ही पक्षांमध्ये प्रत्येकी ८५ जागांचा फॉर्म्युला ठरला असेल, तर त्या जागांचा आकडा २५५ एवढा होतो, तर मग संजय राऊत यांनी २७०चा आकडा आणला कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे मविआमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही, हेच दिसते.
(हेही वाचा UBT गटाच्या यादीत प्रिंटीग मिस्टेक, पहिली बाद दुसरी सुधारित)
मविआत आलबेल नाहीच
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्यासह घटक पक्षांच्या महाविकास आघाडीमध्ये (MVA) बुधवारी जागा वाटपांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काही जागा निश्चित झाल्यानंतर सायंकाळी मविआच्यावतीने उबाठा शिवसेनेचे खासदार व नेते संजय राऊत यांनी प्रसारामध्यमांशी बोलतांना तिन्ही पक्षांमध्ये प्रत्येकी ८५ जागांचा फॉर्म्युला ठरल्याचे जाहीर केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना आतापर्यंत २७० जागांचा तिढा सुटला असल्याचे सांगितले. परंतु ठरलेला फॉर्म्युला आणि तिढा सुटलेल्या जागा यांचे गणितच जुळत नसल्याने महाविकास आघाडीकडून चुकीची माहिती देत आघाडीत सर्व आलबेल असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. तसेच संजय राऊत यांनी सध्याच्या प्रसिध्द केलेल्या यादीमध्येही काही जागांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये (MVA) अद्यापही जागांचा तिढा कायमच असल्याचे स्पष्ट होत आहे.
Join Our WhatsApp Community