मलाही अडकवण्याचा प्रयत्न झाला; गिरीश महाजनांचाही आरोप 

127
महाविकास आघाडीने देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचे कारस्थान रचले होते, असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला, त्याआधी स्वतः फडणवीस यांनीही असे वक्तव्य केले होते. आता भाजपचे नेते, मंत्री गिरीश महाजन यांनीही महाविकास आघाडीच्या सरकारवर असेच आरोप केले आहेत.
मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या वादा प्रकरणी छापेमारी प्रकरणात दाखल गुन्ह्यात जळगाव शहर पोलिसांनी रविवारी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना जळगाव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी पेनड्राईव्हचा देखील उल्लेख केला. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुद्दा उपस्थित केला. मला फसवण्याचा कट होता. माझ्या गाडीत गांजा टाका, मेडिकलमध्ये काही काढा, असे प्रविण चव्हाण बोलत होते, पेनड्राईव्ह आहे, असे गिरीश महाजन म्हणाले.
(हेही वाचा भाजपमुळे इतर पक्षांच्या माजी नगरसेवकांना प्रत्येकी तीन कोटींच्या विकास कामांची लॉटरी?)

गिरीश महाजन यांनी उल्लेख केलेले पेनड्राईव्ह प्रकरण तेच आहे जे गेल्यावर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनादरम्यान मांडले होते. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे थेट पेन्ड्राईव्ह जमा करत खळबळ उडवून दिली होती. या पेन्ड्राईव्हमध्ये विशेष सरकारी वकील यांचे संभाषण होते. चव्हाण यांनी गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी प्लॅन आखल्याचा दावा त्यांनी केला होता. याच प्रकरणी प्रवीण चव्हाण यांना काल पोलिसांनी अटक केलीय. त्यांना आज जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या कारवाईनंतर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी गिरीश महाजन यांनी खळबळजनक दावा केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.