Jode Maro movement: मोर्चाला परवानगी नाही, तरीही मुंबईत मविआचं आंदोलन

120
Jode Maro movement: मोर्चाला परवानगी नाही, तरीही मुंबईत मविआचं आंदोलन
Jode Maro movement: मोर्चाला परवानगी नाही, तरीही मुंबईत मविआचं आंदोलन

४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्रभर तीव्र संताप उसळला. या घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीने मुंबईत ‘जोडे मारो’ (Jode Maro movement) आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले.

(हेही वाचा-Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा तणाव; कुकी आतंकवाद्यांनी भाजप नेत्याचे घर जाळले)

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देत मुंबईतील रस्त्यांवर उतरण्याचा निर्णय घेतला आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांसह शेकडो कार्यकर्त्यांनी गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने मोर्चा काढला. (Jode Maro movement)

(हेही वाचा-Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा तणाव; कुकी आतंकवाद्यांनी भाजप नेत्याचे घर जाळले)

सुरुवातीला पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे आंदोलनाला परवानगी का दिली नाही, असा सवाल महाविकास आघाडीने उपस्थित केला होता. या आंदोलनातून महाविकास आघाडीने राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आणि सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (Jode Maro movement)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.