विधानसभा निवडणूक (Assembly Election 2024) येत्या नोव्हेंबर महिन्यात घोषित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणूकीपूर्वी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi Press conference) शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत महायुतीवर गंभीर आरोप केले आहेत. ‘विधानसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक झाली पाहिजे, मतदान वाढले पाहिजे असे निवडणूक आयोग सांगत असते पण निवडणूक आयोगाच्या कामातच पारदर्शकता व निष्पक्षपातीपणा दिसत नाही. सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर अधिकारी काम करत आहे.’ यामागे एकनाथ शिंदे (CM Eknath Shide) व देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आहेत असा गंभीर आरोप करून रडीचा डाव खेळू नका, हिंमत असेल तर आमने सामने लढा असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. असे आरोप मविआने केले आहेत. (Assembly Election 2024)
शिवालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, विधानसभा निवडणूकीतील पराभवाच्या भीतीने भाजपाचा (BJP) हा रडीचा डाव सुरू आहे. परंतु, भाजपा आणि त्यांच्यासोबत असलेल्या पक्षांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. दम असेल तर समोरासमोर येऊन महायुतीने लढावे. पराभवाच्या भीतीने मतदार याद्यात घोळ घालण्याचे काम सुरू आहे. भाजपाने मतदार यादीतून अनेक नावे वगळण्याचे आदेश दिले आहेत. जाणीवपूर्वक नावे वगळली आहेत. ७ नंबरचा ऑनलाईन अर्ज कोण भरत आहे, याची माहिती निवडणूक आयोगाकडे नाही. तरी आयोगाने यामध्ये तातडने लक्ष घालावे. तसेच महायुतीचा प्रचार करण्यासाठी राज्याच्या तिजोरीची उधळपट्टी सुरू आहे. भाजपाच्या योजना दूतांचा सुळसुळाट झाला आहे, त्यांचा पर्दाफाश करावा. राज्याच्या तिजोरीला वाचविण्य़ाची गरज आहे, असे पटोले म्हणाले. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – मुंबईत माजी महापौर Datta Dalvi यांना फेरीवाल्यांकडून शिवीगाळ )
विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) म्हणाले की, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ज्या ठिकाणी अधिक मते मिळाली. तेथे हा प्रयोग करण्यात येत आहे. मत कमी करण्याचा महायुतीचे प्लॅलिंग आहे. मतदार यादीत प्रचंड गोंधळ आहे. मतदार यादीतील नावही वाचता येत नाही. तरी मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आही की नाही याची खातरजमा करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच यावेळी शिवालय येथे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल देसाई, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community