माझा मुलगा LLB करतोय तरी त्याचं नाव TET घोटाळ्याच्या यादीत कसं? सत्तारांचा सवाल

95

गेल्या दीड महिन्यापासून रखडलेला एकनाथ शिंदे मंत्रिमंडलाचा विस्तार मंगळवारी झाला. यावेळी शिंदे गटासह भाजपच्या प्रत्येकी ९ मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यासंदर्भात स्वतः अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराच्या एक दिवस अगोदर माझी बदनामी करून अडकविण्याचे हे षडयंत्र होते, असे सत्तार यांनी म्हटले आहे. यासह माझा मुलगा LLB चे शिक्षण घेत आहे तरी त्याचं नाव TET घोटाळ्याच्या यादीच कसं आलं? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले अब्दुल सत्तार

मला दिलेल्या जबाबदारीचा फायदा मी समान्य माणसांपर्यंत पोहोचणार आहे. मला जाणून बुजून अडकविण्याचा प्रयत्न झाला आहे, मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या बरोबर एक दिवस अगोदरच हे प्रकरण समोर येतं म्हणजे काय. माझा मुलगा एलएलबीचे शिक्षण घेतोय, तरी त्याचं नाव टीईटीच्या घोटाळा यादीत कसं येतं, याला काय म्हणावं. माझ्या मुली २००८ मध्ये नोकरीला लागल्या आहेत. त्यावेळी टीईटी नव्हती. आता त्यांचे लग्न झालेले आहेत. त्यांना मुलं बाळं आहेत. त्यामुळे कोणीही असे कोणालाही बदनाम करू नये, असे सत्तार यांनी स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – …म्हणून संजय राठोडांना मंत्रिमंडळात स्थान; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले कारण)

टीईटी परीक्षा घोटाळ्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी जारी करण्यात आली आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली. दरम्यान, या यादीत सिल्लोडचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांचे नाव समोर आले आहे. याबाबत अब्दुल सत्तार यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. तर या प्रकरणाची सत्यता पडताळली पाहिजे असेही सत्तार यांनी म्हटले आहे. माझ्याकडे रविवारी दुपारी साडे अकरा वाजता यादी आली, त्यानंतर मी स्पष्टीकरण दिले की कोणीतरी खोटी बातमी चालवत असून, कोणीतरी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे नाहक बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अब्दुल सत्तारांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.