Bangkok Earthquake : म्यानमार भूकंपातील मृतांची संख्या १६७ वर, ७३० जखमी

Bangkok Earthquake : म्यानमार भूकंपातील मृतांची संख्या १६७ वर, ७३० जखमी

58
Bangkok Earthquake : म्यानमार भूकंपातील मृतांची संख्या १६७ वर, ७३० जखमी
Bangkok Earthquake : म्यानमार भूकंपातील मृतांची संख्या १६७ वर, ७३० जखमी

म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या शक्तीशाली भूकंपामुळे (Bangkok Earthquake) मोठा विध्वंस होत आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने अहवाल दिला आहे की म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवारी 7.2 रिश्टर स्केलचा धोकादायक भूकंप झाला. देशभरात भूकंपाचे धक्के जाणवले. सर्वात धोकादायक बाब म्हणजे भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर होता. (Bangkok Earthquake)

 

हेही वाचा-BMC : मुंबईतील गरीब, गरजू महिला आचारसंहितेमुळे यंत्रसामुग्रीला मुकल्या; आता झाला मार्ग मोकळा

भूकंपात १६७ जण ठार झाले असून, ७३० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे म्यानमारमध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे. म्यानमारच्या दुसऱ्या क्रमांकाच्या मंडाले शहराजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता व येथे ६.४ तीव्रतेचा धक्का बसला. भूकंपानंतर राजधानी नेपिता व मंडालेसह सहा राज्यांत आणीबाणी जाहीर झाली. (Bangkok Earthquake)

हेही वाचा- Sanjay Raut हे Kunal Kamra चा कार्यक्रम करणार; नेटकऱ्यांकडून चिंता

रेड क्रॉसने म्हटले आहे की, मंडाले व सागाइंग प्रदेश तसेच दक्षिण शान राज्यात वीजवाहिन्या कोसळल्या असल्यामुळे पथकांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हे आणि जर्मनीच्या जीएफझेड सेंटर फॉर जिओसायन्सेसने सांगितले की, शुक्रवारचा भूकंप भूपृष्ठाखाली १० किलोमीटरवर होता. बँकॉकमध्ये भूकंप होताच नागरिकांत घबराट पसरली. आधीच वर्दळीच्या असलेल्या रस्त्यांवरून सायरनचा आवाज करीत अनेक वाहने धावू लागली. यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली. उन्नत जलद वाहतूक व्यवस्था आणि भुयारी मार्गही बंद करण्यात आला. (Bangkok Earthquake)

शेजारी देशांतही कंपने
म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाची कंपने शेजारील देशांमध्येही जाणवली. कोलकाता आणि इंफाळमध्ये सौम्य कंपने जाणवली असून कोणतेही नुकसान झाले नाही. बांगलादेशमध्ये ढाका, चितगावसह विविध ठिकाणी धक्के जाणवले. चीनमध्ये युनान, सिचुआन प्रांतातही धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. (Bangkok Earthquake)

मदतीसाठी भारत तयार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार व थायलंडमधील विनाशकारी भूकंपाबद्दल चिंता व्यक्त केली आणि भारत दोन्ही देशांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले. मदतीसाठी अधिकाऱ्यांना सज्ज राहण्यास सांगितले असून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला दोन्ही देशांच्या सरकारांशी संपर्कात राहण्यास सांगितले आहे, असे मोदी म्हणाले. (Bangkok Earthquake)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.