रामदास आठवलेंच्या रिपाईचा नागालँडमध्ये डंका

107
महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. पण दुसरीकडे ईशान्येकडील निवडणुकांचे निकालही समोर आले आहेत. या निवडणुकीचा निकाल रिपाईचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना आनंद देणारा ठरलेला आहे. कारण या निवडणुकीच्या निकालामुळे पहिल्यांदाच रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने विधानसभेत प्रवेश केला आहे. आठवलेंच्या आरपीआय पक्षाचे २ उमेदवार नागालँडमध्ये विजयी झाले आहेत.
पहिल्यांदाच आरपीआय आठवले गटाच्या २ उमेदवारांनी महाराष्ट्राबाहेर विधानसभेत गुलाल उधळला आहे. नागालँडमध्ये भाजपा-एनडीपीपी आघाडीवर असून आठवलेंच्या २ विजयी उमेदवारामुळे आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ६० पैकी ५५ जागांवरील ट्रेंडनुसार, ४०:२० जागा वाटप करारावर भाजपसोबत युती करून निवडणूक लढवणारा राष्ट्रवादी लोकशाही पुरोगामी पक्ष २० जागांवर पुढे आहे. दुसरीकडे भाजपा सध्या १० जागांवर आघाडीवर आहे. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले)ही २ जागा जिंकल्या आहेत. ईशान्येकडील तीन राज्य त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस 2 मार्च रोजी सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. या तिन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी ६० जागा आहेत. या निवडणुकीसाठीचे मतदान त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारी, तर नागालँड आणि मेघालयमध्ये २७ फेब्रुवारी रोजी झाले होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.