लोकसभा निवडणुकी दरम्यान (Nagpur Banner) विदर्भात मतदारांनी उत्साह दाखवला नाही. निवडणूक आयोग आणि सामाजिक संघटनांनी मतदानाविषयी जनजागृती केली. परंतु त्यानंतरही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा कमी मतदान झाले. २०२४ लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला आहे. यामुळे नागपूरमधील सामाजिक संघटना आणि सुज्ञ नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. नागपूर लोकसभा मतदारसंघात फक्त ५४.३० टक्केच मतदान झाले. यामुळे मतदान न करणाऱ्यांच्या निषेधाचे फलक नागपूर शहरात लावण्यात आले आहे. शहरातील ट्राफीक मार्क चौकात फलक लावण्यात आले आहेत. (Nagpur Banner)
‘Shame On You’
नागपूर लोकसभा मतदारसंघात २२ लाख २३ हजार २८१ मतदारांची नोंदणी आहे. पण यापैकी तब्बल १० लाख १५ हजार ९३७ लोकांनी मतदान केलं नाही, त्यामुळे ‘Shame On You’ अशाप्रकारचे निषेधाचे फलक (Nagpur Banner) नागपुरात लावण्यात आले आहे. ज्यांनी मतदान केले नाही, त्या मतदारांच्या सिटीझन फोरमकडून निषेध करण्यात आले आहे. या फलकांवर कुठल्याही एका व्यक्तीचं नाव नाही. मात्र हे बॅनर्स चर्चेचा विषय ठरत आहेत. (Nagpur Banner)
राजकीय पक्षही जबाबदार
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झाले. याबद्दल सुज्ञ नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तसेच मतदारांना घराबाहेर न काढू शकल्याबद्दल राजकीय पक्षही जबाबदार आहे. (Nagpur Banner) कमी मतदान होण्यास जिल्हा बीएलओ जबाबदार आहे. नागपुरात मतदान न करणाऱ्याविरोधात संताप व्यक्त होत आहे. या बॅनर्सवर कोणाचे नाव नाही. परंतु मतदान करणाऱ्यांकडून हे प्रसिद्ध करण्यात आले आहे. (Nagpur Banner)
हेही पहा –