Safran Project: नागपुरात होणारा आणखी एक प्रकल्प गेला महाराष्ट्राबाहेर

144

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात होणारे मोठे प्रकल्प इतर राज्यात गेल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सर्वात पहिले वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला होता. त्यानंतर टाटा एअरबसचा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प नागपूरमध्ये होणारा प्रकल्प देखील गुजरातमधील वडोदऱ्याला गेला. त्यानंतर आता नागपूरात होणार आणखी एक प्रकल्प हैदराबादला गेला आहे.

(हेही वाचा – SRA scam: ठाकरेंच्या दबावामुळे पेडणेकरांविरुध्द कोणतीच चौकशी झाली नाही; सोमय्यांचा आरोप)

मिळालेल्या माहितीनुसार, फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन ही विमान इंजिन दुरूस्त देखभालचा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये टाकणार होती, मात्र हा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. जमीन मिळण्यास उशीर झाल्याने हा प्रकल्प राज्याबाहेर देल्याची माहिती मिळत आहे. असेही सांगितले जात आहे की, ११५ कोटींची प्राथमिक गुंतवणूक असणारा प्रकल्प सॅफ्रन कंपनीचा होता जो हैदराबादला गेला आहे. हा प्रकल्प राज्याबाहेर जाण्याने राज्यातील तब्बल ५०० ते ६०० कामगारांचा रोजगार बुजाला आहे. प्रशासकीय विलंबामुळे हा प्रकल्प हैदराबादला गेला असून कंपनीचे सीईओ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन प्रकल्प हैदराबाद हलवण्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, हे सर्व प्रकल्प कोणामुळे महाराष्ट्राबाहेर जात आहे. याबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसतेय. मात्र महाराष्ट्रातील रोजगार कमी होतोय याकडे कोणाचे लक्ष असणार आहे का असा सवाल जनतेकडून उपस्थित केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.