मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) नागपूर हिंसाचाराच्या कठोर चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता या प्रकरणाचा मास्टरमाईंड अखेर सापडला आहे. पोलीस एफआयआरमधून या घटनेच्या सुत्रधाराची माहिती समोर आली आहे. आरोपीचे नाव फहीम शमीम खान (Faheem Khan) असून त्यांच्यामुळेच दंगलीला रौदरुप मिळाले, असे पोलीसांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे.
( हेही वाचा : अकोला शहरातील मलनि:स्सारण प्रकल्पामुळे बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करणार; मंत्री Uday Samant यांची माहिती)
फहीम शमीम खान (Faheem Khan) हा राजकीयदृष्ट्याही सक्रीय असल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. फहीम हा माइनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा नागपूर शहर अध्यक्ष आहे. तसेच फहीम हा नागपूरच्या संजय बाग कॉलनीमधील (Sanjay Bagh Colony) यशोधरा नगरचा रहिवासी आहे. फहीम (Faheem Khan) आतापर्यंत अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्याने २०२४ साली लोकसभा निवडणुक माइनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या (Minorities Democratic Party) तिकिटावर लढवली होती. या निवडणुकीत त्याचा दारुण पराभव झाला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात तो उभा होता. फहीमला लोकसभेत १०७३ मते मिळाली होती.
फहीम माइनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीतर्फे राजकारणात सक्रीय असल्याने शहरात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत होता. तो अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. फहीमच्या विरोधात पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल आहेत. आता नागपूर हिंसाचार प्रकरणी तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
दरम्यान नागपूर हिंसाचार (Nagpur violence) हा पूर्वनियोजित कट होता, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. फहीम खानने (Faheem Khan) काही कट्टरपंथींना एकत्र करत ही दंगली घडवण्याचा प्रयत्न केला आहे. हिंसाचाराच्या एक दिवस आधी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्याबाहेर काही लोक जमले होते. त्यांनी ‘औरंगजेब जिंदाबाद’ च्या घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी फहीम खानही उपस्थित होता. जमावाला भडकवण्याचे काम प्रमुख काम फहीम खान याने केलं असल्याचं पोलिसांचा दावा आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community